Devendra Fadnavis : फडणवीसांचा भाजपसह मित्रपक्षांना मोलाचा सल्ला; 'आता एकमेकांवर खापर...'

Maharashtra BJP Politics : फडवणवीसांनी आताही राज्यात भाजपच कसा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला, हे पटवून दिले. तसेच काही जागांचे उदाहरण देत समन्वयाचा आभावामुळे पराभवाला समारे जावे लागल्याची कबुलीही दिली.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत 28 पैकी फक्त 9 जागा जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह Amit Shah यांच्यापुढे मांडला. मात्र तो अमान्य करत शाह यांनी त्यांना आता जसे सुरू आहे, तेच सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. दिल्लीतून मुंबईत आल्यानंतर फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांत हुंकार भरला. तसेच लोकसभेच्या पराभवाचे खापर एकमेकांवर न फोडता इमानदारीने काम करण्याचा सल्ला दिला.

भाजपच्या आढावा मेळाव्यात, फडवणवीसांनी आताही राज्यात भाजपच कसा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला, हे पटवून दिले. तसेच काही जागांचे उदाहरण देत समन्वयाचा आभावामुळे पराभवाला समारे जावे लागल्याची कबुलीही दिली. मात्र ही वेळ एकमेकांची उणीदुणी काढण्याची नाही. आता पराभवाचे खापर कुणावरही न फोडता विधानसभेसाठी आपल्याला चांगले वातावरण असल्याचा विश्वासही फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.

फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, माझ्याकडे लोकसभा निवडणूक विश्लेषणाच्या अनुषंगाने भरपूर माहिती आहे. मात्र त्या माहितीचा उपयोग आगामी काळात फायदा करून घेण्यासाठी आहे. कधीकधी पराजय होतो, तो स्वीकारावा लागतो. आता तुम्हाला एकच विनंती आहे, की पराजय झाल्यानंतर एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडायला नको. आपली काही मते आहेत. आपल्यालाही काही ठिकाणी समन्वयाचा आभाव आढळला आहे. आता त्याबाबत जाहीरपणे बोलण्याची गरज नाही. त्याबाबत महायुतीतील नेत्यांशी मी बोलणार आहे, असे म्हणत फडणवीसांनी भाजपच्या नेत्यांसह मित्र पक्षातील नेत्यांनाही सबुरीचा सल्ला दिला.

अनेक वेळा आपले प्रवक्ते असे बोलून जातात की त्यामुळे आपासात गैरसमज होण्याची शक्यता असते. आता प्रवक्त्यांनी समजून उमजून बोलले पाहिजे. मी नितेश राणे यांनाही तसे सांगितले आहे. ही वेळ उणीदुणी काढण्याची नाही. लोकसभेत भाजपने इमानदारीने काम केले आहे. यापुढेही एकमेकांना सोबत घेऊन काम करणे गरजेचे आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार या दोघांशीही बोललो, की आता विविध विश्लेषणे करू नका, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : लोकसभेचा पराभव जिव्हारी; फडणवीसांनी दिले मोठ्या राजकीय बदलाचे संकेत; म्हणाले, 'नव्याने पेरण्याची वेळ...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com