Raj Thackeray, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : राज ठाकरेंसोबत आघाडीची चर्चा? खुद्द फडणवीसांनीच सांगितलं भेटीचं कारण...

Raj Thackeray Meeting BJP-MNS alliance news BMC Election update : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

Rajanand More

Mumbai News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट झाली. मुख्यमंत्री फडणवीस हे जवळपास दीड तास ठाकरेंच्या घरी होती. त्यांच्यासोबत मनसेचे इतर नेतही उपस्थित होते. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असावी, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यानंतर खुद्द फडणवीसांनी आजच्या भेटीमागचे कारण सांगितले आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे एकला चलोची भूमिका घेणार की महायुतीत जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वबळाचा नारा दिला होता. पालिका निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडूनही तयारी सुरू असतानाच मुख्यमंत्री आज राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते. त्यामुळे मग आघाडीच्या चर्चा सुरू झाल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ही कुठलीही राजकीय भेट नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता. त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं, मी घरी येईन. त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो. ब्रेकफास्ट त्यांच्या घरी केला. गप्पा मारल्या आणि नंतर पुढच्या कार्यक्रमाला गेलो.

भेटीमागे कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीकरता त्यांच्या घरी गेलो होतो. आघाडीचा कोणताही विषय नाही. ही खासगी भेट होती. ही दोस्तीची भेट होती, असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पण असे असले तरी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने अमित ठाकरेंना पाठिंबा दिला होता, हेही विसरून चालणार नाही.

अमित ठाकरे आमदार होणार?

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होणार, अशीही चर्चा रंगली आहे. अमित यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. ही निवडणूक दोन्ही शिवसेना आणि मनसे अशी तिरंगी झाली होती. विधानसभेत मनसेचा एकही आमदार नाही. अमित ठाकरेंच्या रुपाने विधानपरिषदेत पक्षाचा आमदार असणार का, याबाबत आता उत्सुकता वाढली आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT