
Mumbai News : शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला सदस्य नोंदणी आव्हान आहे. यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहे. अशी एक क्लृप्ती भाजप पदाधिकाऱ्यांची अंगलट आली आहे.
भाजपचे सदस्य व्हा, अन् कल्याणच्या सिटीपार्कमध्ये फ्री एन्ट्री घ्या, असा प्रकार केला आहे. त्यामुळे भाजपची ही सदस्य मोहीम चर्चेचा विषय ठरला आहे. महापालिकेच्या पार्कच्या प्रवेशद्वारावर, असा स्टाॅल लावता येतो का, असा सवाल विरोधी पक्षांनी केला आहे.
कल्याणच्या सिटीपार्कमध्ये भाजपने (BJP) सदस्य मोहिमेचा स्टॉल लावला होता. भाजपचे सदस्य व्हा आणि सिटीपार्कमध्ये फ्री एन्ट्री घ्या, असे आवाहन या स्टाॅलवरील पदाधिकाऱ्यांनी केले होते. परंतु महापालिकेच्या पार्क प्रवेशद्वारावर असा स्टाॅल लावता येतो का, असा सवाल विरोधी पक्षांनी केला आहे. त्यामुळे भाजपची ही सदस्य मोहीम चर्चेचा आणि वादाचा विषय ठरली आहे.
वीक एंड असल्याने शनिवारी सायंकाळी सिटी पार्कमध्ये गर्दी होती. कल्याणमधील सिटीपार्कच्या प्रवेशद्वाराजवळ भाजपने सदस्य मोहीम राबविली. तसा स्टॉलच उभारला. एखादा पक्ष महापालिकेच्या (Municipal Corporation) सिटीपार्कच्या प्रवेशद्वाराजवळ सदस्यता मोहिमेचा स्टॉल लाऊ शकतो का? विरोधी पक्षाच्या असताना भाजपने असे केलेल्या या प्रकाराविषयी महापालिका प्रशासन अनभिज्ञ आहे.
कल्याणच्या सिटीपार्कमध्ये सशुल्क प्रवेश दिला जातो. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून 20 रुपये आकारले जातात. भाजपने सदस्य नोंदवताना पार्कचे हे शुल्क भरल्याचे देखील समोर आली. एकप्रकारे सदस्य नोंदणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी आमिष दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
भाजपचे गौरीपाडा विभागाचे अध्यक्ष पंडू म्हात्रे या सर्व प्रकारावर म्हणाले, "दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले आहे. याशिवाय देशात जिथं निवडणुका होत आहे, तिथं भाजपला यश मिळत आहे. या यशाचा जल्लोष आणि आनंद भाजप कार्यकर्त्यांकडून साजरा केला जात आहे. कल्याणमधील सिटीपार्क येथे भाजप सदस्य मोहीम राबविली जात आहे. सिटीपार्कमध्ये एन्ट्रीसाठी २० रुपये शुल्क आकारले जाते. भाजपचे सदस्य होणाऱ्यांचे शुल्क भाजपकडून भरले जात आहे".
भाजप शुल्क भरत असल्याने महापालिकेचे नुकसान नाही. सिटीपार्कच्या 3 प्रवेशद्वाराजवळ सदस्य मोहीम राबविण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेतली आहे का, अशी विचारणा म्हात्रे यांच्याकडे केल्यास त्यांनी परवानगी घेतली नाही, असे सांगितले. तसेच भाजपचा सदस्य होण्यासाठी कोणालाही बळजबरी केली नसल्याचेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.