Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Satara Drugs Case: CM फडणवीसांची सातारा ड्रग्जप्रकरणी शिंदेंना 'क्लीन चिट'; ठाकरेंच्या खासदारानं उचललं मोठं पाऊल; थेट शहांनाच धाडलं पत्र

Arvind Sawant letter to Amit Shah : साताऱ्यातील सावरी गावात 145 कोटींचा ड्रग्जचा साठा सापडला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. या ड्रग्जप्रकरणात सापडलेली जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. पण त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंची पाठराखण करत विरोधक त्यांचे नाव जाणीवपूर्वक गोवत असल्याची टीका केली होती.

Deepak Kulkarni

Satara News: साताऱ्यातील महाबळेश्वर परिसरात असलेल्या सावरी गावात 145 कोटींचा ड्रग्जचा साठा सापडला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. या ड्रग्जप्रकरणात सापडलेली जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. पण त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) पाठराखण करत विरोधक त्यांचे नाव जाणीवपूर्वक गोवत असल्याची टीका केली होती.एकप्रकारे फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना क्लिन चीट दिल्याचीच चर्चा असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेना खासदारानं थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहानांच पत्र लिहिलं आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधताना साताऱ्यात पोलिसांनी धाड टाकून ड्रग्जचा इतका मोठा साठा जप्त केला,त्यासाठी मी सर्वप्रथम पोलीस दलाचे अभिनंदन करतो.जो धंदा चालला होता, त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला.या प्रकरणात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेंचं नाव आणण्याचा प्रयत्न चुकीचा आहे, अयोग्य आहे, निषेर्धाह आहे. आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यात एकनाथ शिंदे यांच्या परिवाराचा संबंध दुरावन्याने आढळून आलेला नाही.आम्ही याप्रकरणाची पूर्ण चौकशी करत आहोत, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं.

आता यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. धरणाजवळ असणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स साठा आढळल्या प्रकरणाची चौकशी व्हावी.तसेच चौकशी होईपर्यंत एकनाथ शिंदे यांना पदावरुन बाजूला करावे अशी मागणी सावंत यांनी या पत्राद्वारे अमित शहांकडे केली आहे.

तसेच या प्रकरणाकडे आवश्यक तेवढ्या गांभीर्याने पाहाल आणि न्याय व राष्ट्रहिताच्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई कराल,असा विश्वासही खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केला आहे.या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी,असं सावंत यांनी पत्रात म्हटलं आहे.संबंधित रिसॉर्ट कोयना धरणाच्या अत्यंत जवळ असल्याने ते बेकायदेशीर असल्याचा जोरदार हल्लाबोलही त्यांनी या पत्रात केला आहे.

सावंत यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय..?

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत पत्रात म्हणतात,सातारा जिल्ह्यातील सावरि गावात छापा टाकण्यात आला,जिथे एका दुर्गम भागात असलेले एक शेड आढळून आले आणि सुमारे 45 किलो एमडी अमली पदार्थ (अंदाजे 145 कोटी किमतीचे) जप्त करण्यात आले. या कारवाईत अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली. ही बाब आणखी गंभीर ठरत असल्याचंही सावंत यांनी पत्रात म्हटलं आहे.

कारण हे शेड “तेज यश” नावाच्या रिसॉर्टपासून अवघ्या 1200 मीटर अंतरावर आहे. रिसॉर्टपासून थेट शेडपर्यंत रस्ता बांधण्यात आलेला असून,अशा प्रवेशमार्गामागील हेतूवर गंभीर प्रश्न निर्माण होतात. तसेच संबंधित रिसॉर्ट कोयना धरणाच्या अत्यंत जवळ असल्याने ते बेकायदेशीर असल्याचा आरोप आहे. प्रचलित नियमांनुसार मोठ्या जलसाठ्याच्या ठराविक अंतरात कोणतेही बांधकाम करण्यास मनाई आहे. अशा उल्लंघनाला परवानगी देणाऱ्या किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका सखोल तपासणीस पात्र आहे असं सांगत अरविंद सावंत यांनी हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचं अमित शाह यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या...?

शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना क्लिन चीट दिलेल्या देवेंद्र फडणवीसांवरही घणाघाती टीका केली होती. त्या म्हणाल्या, माननीय मुख्यमंत्र्यांची तळमळ मी समजू शकते, त्यांनी असा खोटा कळवळा दाखवू नये.त्यांना एकनाथ शिंदे यांच्याविषयी किती कळवळा आहे, त्यांना संपवण्यासाठी ते काय प्रयत्न करत आहेत, हे सांगायला त्यांनी मला भाग पाडू नये असंही त्यांनी सांगितलं.

तसेच दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांना संविधानाचा आदर आहे की नाही, हे सांगावे. संविधानाने न्यायव्यवस्था दिली आहे, कोण बरोबर कोण चूक हे ठरवण्याचे अधिकार त्यांच्या ठायी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: न्यायाधीश होण्याचा प्रयत्न करु नये. तुम्ही न्यायाधीश असाल तर सगळी न्यायालयं बंद करा आणि तुमच्या कार्यालयाबाहेर पाटी लावून ठेवा, इथे क्लीन चिट मिळतील असा टोलाही अंधारे यांनी मुख्यमंत्र्‍यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT