Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : 'सीएम' फडणवीसांच्या 'या' लाडक्या आमदारानं केली मोठी मागणी, म्हणाले, 'लाडकी बहीण योजनेत...'

CM Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

Deepak Kulkarni

Nagpur News : महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्टवर ट्विस्ट पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षात आणि पडद्यामागे अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधिमंडळाचं सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या कामकाजावेळी भाजप त्यातही सीएम देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) लाडक्या आमदारानं मोठी मागणी करुन विधिमंडळाचं सभागृह अवाक् झालं.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार दिमाखदार पध्दतीनं राज्यात सत्तेत परतलं आहे. यातच आता मंत्रिमंडळाचा विस्तारही पूर्ण झाला असून पुढील काही तासांतच खातेवाटपही जाहीर होण्याची शक्यता आहे. आता विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांना आता 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. भाजप आमदारानं थेट या योजनेत तृतीयपंथियांचाही समावेश करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं विधानसभेत 35 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. यामध्ये 1400 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आल्याची घोषणा केली आहे. याचदरम्यान, आता मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केलेली मागणी राजकीय वर्तळात चर्चेचा विषय ठरला.

दटके म्हणाले,राज्यातील महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यात लाडकी बहीण योजना,महिलांना बस प्रवासात सवलत, मोफत उच्च शिक्षण अशा योजनांचा समावेश आहे. पण आता सरकारनं लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथीयांचा समावेश करावा,अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करत असल्याचे ते म्हणाले.

ठाकरेंचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान...

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.तसेच लाडकी बहीण योजनेबाबतही मोठं विधान केलं. ते म्हणाले,आता निवडणूक झाली आचारसंहिता संपली आता ही योजना तत्काळ सुरू करण्यात यावी.

1500 नाही तर 2100 रुपये देतो म्हणून सांगितलं. पण आता निकष लावले जात आहेत. पण लाडकी, आवडती नावडती न करता सर्वांना दिले पाहिजे. आधी निकष लावले नव्हते मग आता का लावताय, लाडक्या बहिणींना सरसकट पैसे दिले पाहिजेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT