Sushma Andhare : ‘गृह खात्याने माणसं पेरली आहेत, कोरेगाव भीमा दंगलीवेळी असणारे पोलिस अधिकारी परभणीत’

Parbhani violence : त्यावेळी पोलिसांनी काळजी घ्यायला हवी होती, ती काळजी पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे आंबेडकरी अनुयायी यांच्याअडून लोकांनी भलतंच केलं. त्यानंतर कोम्बिंगच्या नावाखाली गलिच्छ पद्धतीने पोलिसांनी मारहाण केली.
Sushma Andhare-Devendra Fadnavis
Sushma Andhare-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune, 17 December : परभणी हिंसाचार आणि जाळपोळ प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणावरून विरोधक सातत्याने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही परभणी हिंसाचार प्रकरणावरून राज्यातील गृह खात्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, परभणी हिंसाचार (Parbhani violence) आणि जाळपोळ प्रकरणावर आवाज उठवला जावा; म्हणून मी दोन दिवस नागपूरला होते. परभणीत ज्या दिवशी संविधानाची प्रत उद्‌ध्वस्त करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करण्यात आले होते.

त्यावेळी पोलिसांनी काळजी घ्यायला हवी होती, ती काळजी पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे आंबेडकरी अनुयायी यांच्याअडून लोकांनी भलतंच केलं. त्यानंतर कोम्बिंगच्या नावाखाली गलिच्छ पद्धतीने पोलिसांनी मारहाण केली. या पोलिसांच्या मारहाणीमुळे एक तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबाला धमकावण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Sushma Andhare-Devendra Fadnavis
Kolhapur Politics : कोल्हापूरच्या दोन मंत्र्यांपुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे कडवे आव्हान

परभणीच्या जाळपोळीमध्ये ठरवून लोक घुसवण्यात आले. परभणीत जे पोलिस अधिकारी आहेत. ते कोरेगाव भीमा दंगलीवेळी असणारे पोलिस अधिकारी तिकडे होते. गृह खात्यात माणसे पेरलेली आहेत, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. तसेच, जेव्हा जेव्हा भाजपची सत्ता येते तेव्हा दलित आणि अल्पसंख्याक भेदरून जातात. महायुतीच्या विजयाचा उन्माद भीती उत्पन्न करणारी आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

Sushma Andhare-Devendra Fadnavis
Ranjitsinh Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपकडून शिस्तभंगाची नोटीस...

सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी पाहायला मिळत आहे, त्याबाबत अंधारे म्हणाल्या, छगन भुजबळ हे चळवळीतलं नाव आहे. मराठा ओबीसी वादाचा नाहक बळी हे भुजबळ गेले आहेत. तसेच, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा त्यांच्या अंगलट आलेली असावी, असं सुषमा अंधारे म्हणल्या.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com