पुणे : राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारच्या कामगिरीबाबत आज (ता. २७) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुण्यात माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, त्यावर फडणवीस यांनी थोडक्याच शब्दात प्रतिक्रिया दिली.
ठाकरे सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत, सरकारच्या कामगिरीकडे तुम्ही कशापद्धतीने पाहता, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, ''सरकारची नेमकी कामगिरीच काय आहे की ज्यावर मी बोलू. जिथे कामगिरी असते तिथे मूल्यमापन केले जाते. सरकारची कामगिरीच नाही त्यामुळे मूल्यमपान करण्याचा प्रश्नच येत नाही, असे फडणवीस म्हणाले.
सकाळ माध्यम समूहाने केलेल्या सर्वेबद्दल त्यांना विचारले असता फडणवीस म्हणाले, मला आनंद आहे की आजही राज्यातील नंबर १ चा पक्ष हा भाजपच आहे. असे त्यांनी बोलून दाखवले.
शुक्रवारी दिल्लीत माझी कुठलीही राजकीय भेट नव्हती. आम्ही दिल्लीत गेलो की आमच्या नेत्यांबरोबर चर्चा करत असतो. राज्यात काय सुरू आहे याबाबत माहिती त्यांना देतो. कालही मुख्य उद्देश हा संघटनात्मक बैठकीचा होता. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी दिल्लीत संघटनात्मक बैठकीला गेलो होतो. जवळपास तीन-चार तास आमची संघटनात्मक बैठक होती, अशी माहिती फडणवीस यांनी दिल्लीच्या दौऱ्याबाबत दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.