Devendra Fadnavis, Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

'ही तर सामान्य माणसाची क्रूर थट्टा!'

ठाकरे सरकारने (Thackeray government) पेट्रोलच्या मुल्यवर्धित करात (VAT) 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलवरील करात 1 रुपये 44 पैसे कपात करण्याचा निर्णय घेतला.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ठाकरे सरकारनेही (Thackeray government) महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेला दिलासा देत पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या मुल्यवर्धित करात (VAT) 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलवरील करात 1 रुपये 44 पैसे कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली आहे.

या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये फडणवीस म्हणाले, इंधन दरकपात करताना केंद्र सरकारने 2,20,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती. देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा 15 टक्के! इंधन दर कपातीत किमान 10% तर भार घ्यायचा. पण नाही! याला म्हणतात 'उंटाच्या तोंडात जिरे'! अन्य राज्य सरकारे 7 ते 10 रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याने 1. 5 आणि 2 रुपये दर कमी करणे, ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे." असा घणाघातील आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

तर भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) टीका केली आहे. त्या म्हणाल्या, कद्रू दानतीच्या महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पेट्रोल २ रुपये ८ पैसे तर डिझेल १ रुपये ४४ पैसे स्वस्त होणार आहे. मोदी सरकारची कर कपात म्हणजे नरेन्द्रचा ऐरावत आणि ही बघा ठाकरे सरकारची तट्टाणी. तीव्र निषेध.., अशा शब्दांत वाघ या निर्णयावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शनिवारी उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यांवरही दर कमी करण्याचा दबाव वाढला होता. मागील काही दिवसांत सातत्याने इंधन दरवाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक होरपळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारवरही दबाव वाढला होता.

शनिवारी केंद्र सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रतिलिटर ८ रुपये तर डिझेलवर ६ रुपयांनी कमी केली आहे. यामुळे पेट्रोल ९.५ रुपये तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 16 दिवसांत 14 वेळा वाढ करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारने सामान्य जनतेला दिलासा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT