राज्यात पेट्रोल 11 रुपये 58 पैसे अन् डिझेल 8 रुपये 44 पैशांनी झाले कमी; असे असतील नवे दर

राज्य सरकारने रविवारी पेट्रोल व डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात केली आहे.
Petrol, Diesel Price Latest Marathi News
Petrol, Diesel Price Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी करात शनिवारी प्रतिलिटर अनुक्रमे 8 रुपये तर डिझेलवर 6 रुपये कपात केली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारनेही मुल्यवर्धित करात कपात करत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे राज्यातील पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे 11 रुपये 58 पैसे आणि 8 रुपये 44 पैशांनी कमी झाले आहेत. (Petrol Diesel price hike News)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शनिवारी अबकारी करात कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्य शासनाने रविवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. (Maharashtra Government reduces price of Petrol and Diesel)

Petrol, Diesel Price Latest Marathi News
Breaking : अखेर ठाकरे सरकारनं करून दाखवलं! राज्यात पेट्रोल अन् डिझेलच्या दरात कपात

काही शहरांमधील पेट्रोलचे दर

राज्य व केंद्र सरकारने कर कमी केल्याने राज्यातील पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे 11 रुपये 58 पैसे आणि 8 रुपये 44 पैसे झाले आहेत. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचे दर हे दर 09.45 तर पुण्यात 108.87 पैसे असतील. नाशिकमध्ये 109.75, नागपूरमध्ये 109.35, औरंगाबादमध्ये 110. 95 रुपये होतील. तर रत्नागिरीमध्ये 110.77 आणि परभणीत 111.9 रुपये होणार आहेत.

दरम्यान, मोदी सरकारने गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडूनही दरवाढ थांबवण्यात आली होती. नंतर ती पुन्हा सुरू झाली होती. त्यावेळी सर्व भाजपशासित राज्यांसह काही विरोधी पक्षांच्या राज्यांनीही दर कमी केले. पण महाराष्ट्र सरकारने कपात केली नव्हती. आता दुसऱ्यांदा केंदाने कपात केल्यानंतर राज्य सरकारनेही दर कपात केली.

केंद्राने मागील वर्षी कर कमी केल्यानंतर सुमारे साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 16 दिवसांत 14 वेळा वाढ करण्यात आली. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 10 रुपयांनी महागले होते. त्यानंतर 6 एप्रिलनंतर ही दरवाढ थांबली आहे. त्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.41 रुपये असून, डिझेलचा दर 96.67 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com