Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : गौतम बुद्धांचे विचार संविधानिक मूल्य म्हणून बाबासाहेबांनी रूजवले!

सरकारनांमा ब्यूरो

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 वा महापरिनिर्वाणदिन (Babasaheb Ambedkar Death Anniversary) आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले. त्यांनी यावेळी बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून, त्यांना मानवंदना अर्पण केली. यावेळी फडणविसांनी मनोगत व्यक्त केले.

फडणवीस म्हणाले, "आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालण्यासाठी संकल्प करण्याचा दिवस आहे. या देशाची दशा आणि दिशा बदलण्याचं काम आंबेडकरांनी केलं. देशाला संविधान दिलं, खऱ्या अर्थाने समतेचं आणि लोकशाहीचं राज्य संविधानाने आणलं. जन्माने, जातीने, धर्माने, भाषेने समान अधिकार आणि कोणामध्येही भेदभाव न करण्याचं बीजमंत्र या संविधानाने केलं."

जगाच्या पाठीवरचं सर्वोच्च संविधान आपल्याला बाबासाहेबांनी दिलं. आज आपचा देश प्रगती करतोय याचं एकमेव कारण संविधान आहे. संविधानाने आमची लोकशाही जिवंत ठेवली. सामान्यातल्या सामान्य माणसाला सर्वोच्च संधी संविधानाने आम्हाला उपलब्ध करून दिली, असेही फडणवीस म्हणाले.

समतेचा, बंधुतेचा, मानवतेचा आंबेडकरांनी जो संदेश दिला, तो संदेशच जगाचा कल्याणाचा संदेश आहे. भगवान गौतम बुद्धांचे जे विचार आहे. ते विचार संविधानाच्या माध्यामातून या देशाच्या प्रत्येक माणसात संविधानिक मूल्य म्हणून त्यांनी रूजवलं केलं. हे फार मौल्यवान आहे. देशाचे पंतप्रधान मोदीजी सुध्दा म्हणतात की, माझ्या सारखा चहावाल्याचा मुलगा या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, याचं कारण आंबेडकरांनी लिहलेलं संविधान आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT