Raj Thackeray PC on Toll  
मुंबई

Raj Thackeray on Toll Issue : देवेंद्र फडणवीस धादांत खोटं बोलत आहेत; राज ठाकरेंनी 'तो' व्हिडिओच दाखवला

Raj Thackeray Criticized Fadanvis : दुचाकी, तीनचाकी, चारचाकीला टोल लावू दिला जाणार नाही. जर याला विरोध झाला तर हे टोल नाके आम्ही जाळून टाकू

अनुराधा धावडे

Mumbai Political News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धादांत खोटं बोलत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली. टोलचे पैसे कुठे आणि कोणाकडे जातात, असा प्रश्न विचारत टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा झोल आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. टोलवरून पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर राज ठाकरे यांनी तोफ डागली. विशेष म्हणजे या वेळी त्यांनी फडणवीसांचा एक व्हिडिओदेखील दाखवला.

राज ठाकरे म्हणाले, 'दोन-तीन दिवसांपूर्वीच माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी दुचाकी, चारचाकी, शाळेच्या गाड्यांना टोल आकारला जात नाही, केवळ व्यावसायिक वापराच्या वाहनांवरच टोल आकारला जात असल्याचे सांगितले होते; पण प्रत्यक्षात सर्वच वाहनांना टोल आकारला जातो. खऱ्या अर्थाने टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे आणि याची शहानिशा झालीच पाहिजे.

मी दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, त्यांच्याकडून काय उत्तर येतं ते पाहू,अन्यथा प्रत्येक टोल नाक्यावर मनसेचे कार्यकर्ते उभे राहतील आणि वाहनांकडून टोल घेऊ दिला जाणार नाही. जर याला विरोध झाला तर हे टोल नाके आम्ही जाळून टाकू, पुढे सरकारला काय करायचे ते सरकारने करावे, असे आव्हानच त्यांनी राज्य सरकारला दिले.

टोल नाक्यांसाठी आंदोलने करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अंगावर केसेस घेतल्या. वर हे सांगतात असं काही झालेच नाही, तर या केसेस काढून टाका. जर चारचाकीला टोल नाही, असे सरकार सांगत असेल, तर याचा अर्थ हे टोल नाके वाहनचालकांना लुटत आहेत. याचे उत्तर सरकारला द्यावेच लागेल. यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT