Uddhav Thackeray on Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Budget: फडणवीसांनी मांडला 7 लाख 69 हजार कोटींचा अर्थसंकल्प, कर्जमाफीचा शब्दही पूर्ण केल्याचा दावा; ठाकरेंचे एक घाव,दोन तुकडे; म्हणाले...

Uddhav Thackeray Political Statement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता.6 मार्च) राज्याचा अर्थसंकल्प सादर सभागृहात सादर केला. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांनी विविध मोठमोठ्या घोषणा केल्या. त्यात गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात तापलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबतची घोषणाही करण्यात आली आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता.6 मार्च) राज्याचा अर्थसंकल्प सादर सभागृहात मांडला. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांनी विविध मोठमोठ्या घोषणा केल्या. त्यात गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात तापलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतचीही महत्त्वपूर्ण घोषणाही करण्यात आली आहे. यात आता पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. एकीकडे या घोषणेनंतर फडणवीसांनी आम्ही जनतेला दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण केल्याचा दावा केला आहे.याचवेळी उद्धव ठाकरेंनी मात्र भाजपची जुनी खोड सांगत सरकारच्या या घोषणेबद्दलची भीतीही बोलून दाखवली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले, मला असं वाटतं की, राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे? हे सर्वजण जाणत आहेत. कर्ज काढून फटाके वाजवणारा हा अर्थसंकल्प असल्याची टीका त्यांनी केली आहे.

पण राज्याचं यातून काही हित साधलं जाईल,असं मला वाटत नाही. तुम्हाला जर शेतकऱ्यांचं खरंच काही भलं करायचं असेल, तर पात्र-अपात्र हा जो काही त्यांनी शा‍ब्दिक खेळ केला आहे. तो तसा न करता, ज्या पद्धतीनं आम्ही कालबद्ध पद्धतीनं शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं, त्याचप्रमाणे त्यांनी करावं, अशी स्पष्ट भूमिका ठाकरेंनी यावेळी मांडली.

यावेळी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती आम्ही केली होती,असा दावा करतानाच ते म्हणाले, पाच वर्षांपूर्वी आमच्या सरकारनं कालबद्ध पद्धतीनं शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली होती. त्यावेळी कोणत्याही अटी किंवा नियम लावले नव्हते. तसेच कोरोना काळात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र, सध्याच्या सरकारनं कर्जमाफी करताना अनेक अटी लावल्या असं सांगतानाच त्यानंतर आमचं सरकार पाडलं गेलं, अशी टीका ठाकरेंनी केली.

याचवेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थोडक्यात विकासाचं मृगजळ दाखवणारा हा अर्थसंकल्प होता. त्यामुळे आता प्रत्येकाला थोड्या दिवसानं कळेल की, या अर्थसंकल्पामुळे त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर भाष्य करताना विकसित महाराष्ट्रासाठी जी थीम तयार केली आहे, यावर आधारित हा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे. हा अर्थसंकल्प सर्व समावेशक आहे. 2 लाखांपर्यत कर्जमाफी आम्ही जाहीर केली असून उत्पादन खर्च 25 टक्क्यांनी कमी आणायचा आणि उत्पादकता वाढवायची असा हा अर्थसंकल्प आहे. 7 लाख 69 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. विकसित महाराष्ट्र 2047 या संकल्पनवरून हा अर्थसंकल्प तयार केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT