Maharashtra Budget 2026: यंदाचं दुष्काळाचं वर्ष? मुख्यमंत्र्यांनी बजेटदरम्यान सांगितलं कारण; उपाययोजनाही केल्या जाहीर

Maharashtra Budget 2026: त्यामुळं आपल्यासाठी ही स्थिती गंभीर असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे.
Maharashtra Budget 2026
Maharashtra Budget 2026
Published on
Updated on

Maharashtra Budget 2026: महाराष्ट्रात हवामानाच्यादृष्टीनं यंदाचं वर्ष कसं जाणार आहे? याचा अंदाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या अर्थसंकल्पाच्या भाषणातून व्यक्त केला. त्यांच्या अंदाजानुसार, यंदाचं वर्ष हे दुष्काळाचं वर्ष असणार आहे. त्यामुळं आपल्यासाठी ही स्थिती गंभीर असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पण त्याचबरोबर यावर काय उपाययोजना करण्याचं सरकारचं नियोजन आहे, हे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Maharashtra Budget 2026
MNS Vardhapan Din: रायगडाच्या साक्षीने मनसेची नवी दिशा? वर्धापन दिनासाठी राज ठाकरेंची खास रणनीती; काय करणार घोषणा?

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेत?

माजी अर्थमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळं अर्थ खात्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी राज्यात यंदा दुष्काळाची परिस्थिती असणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले, "हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या अनेक संस्थांनी सन २०२६ मध्ये 'अल निनो'च्या संभाव्य प्रभावामुळे मॉन्सूनच्या पावसावर परिणाम होऊन दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Maharashtra Budget 2026
Bar Council Election: कोल्हापूर सर्किट बेंच आपणच आणल्याची जाहिरातबाजी भोवणार? ॲड. संग्राम देसाईंवर कारवाईची मागणी

काय करणार उपाययोजना?

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "राज्यात यंदा दुष्काळाची स्थिती असण्याचा अंदाज आहे ही आपल्यासाठी गंभीर बाब आहे. त्यामुळं पिण्याचं पाणी राखून ठेवणं, तसंच जलयुक्त शिवार अभियान आणि जलसंधारण योजनेच्या माध्यमातून पाण्याचे संवर्धन आणि वैरण विकासाकरता प्राधान्यानं उपाययोजना करण्यात येत आहेत"

Maharashtra Budget 2026
Women's Day : महिला दिनानिमित्त मोठी दिलासादायक बातमी! अंनिस अन् नीलम गोऱ्हेंच्या हस्तक्षेपानं हजारो महिलांची 'ती' गैरसोय झाली दूर

शेतकऱ्यांना कर्जमाफी

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यावेळी ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीच्या कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. पण ही सरसकट कर्जमाफी नसून २ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाच माफी दिली आहे. त्याचबरोबर जे नियमितपणे कर्जफेड करतात त्यांच्यासाठी ५०,००० रुपयांची प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com