Devendra Fadnavis News  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : मी ब्राह्मण असल्यामुळेच 'सॉफ्ट टार्गेट', जातीचं कार्ड कधीच खेळत नाही.. ; फडणवीसांचं विधान !

Devendra Fadnavis News : "मराठा समाजाच्या अन् आरक्षणावर नुसंत राजकारण करणाऱ्या नेत्यांना.."

Chetan Zadpe

Devendra Fadnavis News : राज्यामध्ये काही राजकीय घडामोडी घडून आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच विरोधकांकडून लक्ष्य केले जाते. फडणवीस यांच्यावर चहूबाजूंनी टीका-टिपण्णी केली जाते. त्यांनाच का लक्ष्य केलं जातं? यावर आता खुद्द फडणवीस यांनीच भाष्य केले आहे. 'मराठा समाजाच्या अन् आरक्षणावर नुसंत राजकारण करणाऱ्या नेत्यांना मी समाजासाठी काय केलं? असं विचारल्यामुळे त्यांनी माझी बदनामी करण्याचं काम केलं, यांना माझी जात माहिती आहे. मी ब्राह्मण आहे. जात बदलण्याचं कारण नाही. मात्र यामुळे मला सॉफ्ट टार्गेट केलं जातं,' असं वक्तव्य फडणवीसांनी केले. (Latest Marathi News)

एका खसगी मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, "हे आजपर्यंत मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत. ३७ वर्षांपासून त्यांचा हा नाकर्तेपणा सुरू आहे. यामुळेच ते मला लक्ष्य करण्यासाठी एकत्रित होतात. जनता हे सारं पाहते. माझ्यासाठी माझी जात नुकसानकारक ठरते असं मी मानत नाही. मी जातीचं कार्ड कधीच खेळत नाही. सामान्यांच्या मनात जात कधीच नसते. ते केवळ कर्तुत्त्वाकडे पाहत असतात. ते लोकांन काही काळासाठी संभ्रमात टाकू शकतात. माझ्यावर शाब्दीक हल्ले करू शकतात. पण ते हे नेहमीच करू शकत नाही," असेही फडणवीस म्हणाले.

"मला लक्ष्य केल्या जाण्याचं एकमेव कारण आहे, ते म्हणज माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मराठा आरक्षण न्यायालयात टिकवून दाखवलं. खरंतर आरक्षणाची याची लढाई १९८० पासूनच सुरू झाली होती. आण्णासाहेब पाटलांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपले प्राण दिले. तेव्हापासून आरक्षणाची लढाई सुरू झाली. माझ्या कार्यकाळात पहिल्यांदा आरक्षण मी दिलं होतं, कोर्टातही ते टिकवून दाखवंल," असा दावाही फडणवीसांनी केला.

"मात्र केवळ आरक्षणाने सगळ्या समस्या सुटणार नाही. वर्षभरात साधरण ३० हजार नोकऱ्या सुटतात. मराठा समाजाचं १० टक्के जरी आरक्षण ग्राह्य धरलं तर वर्षाला साधरण: ३ हजार नोकऱ्या प्राप्त होतील. यामुळे आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का?" असा परखड आणि बिनधास्त सवालही फडणवीसांनी उपस्थित केला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT