Kasba By-Election : ब्राह्मण समाजाच्या नाराजीच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत; फडणवीसांचा आरोप !

Kasba By-Election : काँग्रेसचा पराभव होईल..
Kasba By-Election :
Kasba By-Election :Sarkarnama
Published on
Updated on

Kasba By-Election : कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रचाराला शेवटचे काही दिवस शिल्लक असताना, उमेदवारांची रणधुमाळी सुरू आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते कसब्यात ठाण मांडून आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा आज कसब्यात रोड शो झाला, या दरम्यान त्यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या विजयाबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला.

फडणवीस यावेळी म्हणाले, "कसबा हा भाजपचा आहे. हा गिरीश बापटांनी बांधलेला आहे. कसब्यात वेगवेगळे अजेंडा राबवण्यात येत आहेत. कधी सांगितलं ब्राह्मण समाज नाराज आहे. कधी सांगितलं जातं टिळक कुटुंब नाराज आहे, पण मी सांगतो की, कसबा हा हिंदुत्ववाद्यांचा मतदारसंघ आहे. कोणी कशाही पद्धतीने नरेटिव्ह रचण्याचा प्रयत्न केला तरी, असं काही होणार नाही. ही वैचारिक लढाई आहे . ही लढाई धंगेकर आणि रासने नाही. ३७० कलम समर्थक आणि ३७० कलम विरोधक यांच्यातली ही लढाई आहे."

Kasba By-Election :
Satara : श्रीनिवास पाटील : संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारे खासदार

"ही निवडणुक जरी कसब्यातली असली तरी, आता ही लढाई वैचारिक झाली आहे. आम्ही छत्रपतींचा विचार सांगणारे लोक आहोत. आंबेडकर आणि फुलेंचा विचार सांगणारे लोक आहोत. या ठिकाणी भाजपचाच उमेदवार निवडून येईल, काँग्रेसचा पराभव होईल. ब्राह्मण समाज नाराज असल्याचा अफवा विरोधकांकडून पसरवल्या गेल्या, पण ये पब्लीक है, ये सब जानती है," असे फडणवीस म्हणाले.

Kasba By-Election :
Sanjay Shirsat News : ठाकरे गटाची बाजू लंगडी, म्हणूनच सिब्बल यांचे भावनिक आवाहन..

भाजपच्या आजच्या रोड शो ला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी फडणवीस यांच्यासह कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते. तसेच भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com