Sanjay raut, Devendra fadnavis sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis ED enquiry News : देवेंद्र फडणवीस यांची 'ती' बातमी अन् 'सामना' बॅकफूटवर!

''...म्हणून संजय राऊतांनी फडणवीसांची माफी मागावी!''

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात न्यायालयाने ईडी चौकशीचे आदेश दिले आहेत असे वृत्त शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मुखपत्र असणार्या सामनासह प्रसारित करण्यात आले होते. मात्र, फडणवीसांच्या ईडी चौकशीचे नाही तर वकील सतीश उके यांनी केलेली तक्रार ईडीकडे वर्ग करण्यास विशेष पीएमएलए न्यायालयाने मुभा दिली आहे. तथापि,याप्रकऱणी न्यायालयाने फडणवीस यांच्या चौकशीचे निर्देश दिलेले नाहीत असे न्यायालयाच्या नोंदीवरुन स्पष्ट झालं आहे. याचवरुन भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे गटाला हल्लाबोल केला आहे. (Atul Bhatkhalkar to Sanjay Raut on Devendra Fadnavis ED enquiry News)

अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टिवि्टद्वारे ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. भातखळकर टिवि्टमध्ये म्हणतात, आमचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ईडी चौकशीचे आदेश न्यायालयाने दिल्याचे धादांत खोटे वृत्त 'सामना'ने दिले होते. मी तेव्हाच म्हटले की सामना रंगतदार होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वकिलामार्फत सामनाचे संपादक म्हणजे शूरवीर, WHO चे डॉक्टर आणि दररोज सकाळी गरळ ओकण्याचा विकार असणारे त्यांचे कंपाऊंडर यांना नोटीस पाठवली आणि आज हा खुलासा प्रकाशित झाला. ईडी चौकशीचे न्यायालयाचे कुठलेही आदेश नाहीत! चुकीच्या बातमीसाठी माफी तर मागा असेही भातखळकर टिवि्टमध्ये म्हणाले आहेत.

सतीश उके यांनी कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी कथित बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यास धरमदास रामाणी. देवेंद्र फडणवीस आणि अमितेश कुमार हे यांची आर्थिक चौकशी करण्याची मागणी करीत ईडीकडे तक्रार फाॅरवर्ड करण्याची विनंती नुकतीच एका अर्जाद्वारे केली. त्यांच्या विनंतीची विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांनी देखील दखल घेत उके यांची तक्रार ईडीकडे वर्ग करण्यास मुभा दिली आहे. तथापि, न्यायालयाने फडणवीस यांच्या चौकशीचे दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहेत. याचवरुन भातखळकर यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.

काय आहे प्रकरण?

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 2008 दरम्यान चर्चेत आलेल्या नागपूर स्टॅम्प घोटाळा प्रकरणात चौकशी करा अशी मागणी अॅड. रवी जाधव यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणातील आरोपी सतीश उके यांचे वकील रवी जाधव यांनी मुंबई सत्र न्यायालयात चौकशीच्या मागणीसाठी अर्ज केला विशेष पीमएलए कोर्टाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी जाधव यांचा हा अर्ज स्वीकारला आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT