Devendra Fadnavis News :
Devendra Fadnavis News :  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis Health News : उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रकृती बिघडली? ; काय आहे सत्य?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : कर्नाटक विधानसभा (Karnataka Assembly) निवडणूक नुकतीच पार पडली. यासाठी भाजपने (BJP News) जोरदार प्रचाराचा धडाका लावला होता. या निवडणूकीत प्रचाराची जबाबदारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis News) यांच्यावरही होती.

या निमित्ताने फडणवीसांचे झालेले प्रचारदौरे, सभांचा धडाका तसेच या निमित्ताने झालेला सततचा प्रवासाचा ताण यामुळे देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडली असून, ते सक्तीच्या विश्रांतीवर जात आहेत, अशा आशयाच्या बातम्या माध्यमातून झळकत होत्या, मात्र आता या बातम्या निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Devendra Fadnavis health deteriorated)

देवेंद्र फडणवीस यांचे कोणतेही कार्यक्रम रद्द झालेले नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda Pune Tour) हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी पक्षाध्यक्षांच्या स्वागतासाठी स्वत: फडणवीस जाणार आहेत. नड्डा आज मुंबईत उतरणार असून, उद्या पुण्यात होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीला येणार आहेत. उद्या पुण्यात होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत.

मे महिन्यात फडणवीस हे कर्नाटकमध्ये पक्षाच्या प्रचारात व्यस्त होते. कर्नाटकात त्यांनी भाजप उमेदवारांवर अनेक सभा घेतल्या. कर्नाटकचा प्रचार आटोपल्यानंतर फडणवीसांनी अमरावती, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांचा दौरा केला. त्यांनतर ते काल पुणे, पिंपरी-चिंचवडनध्येही अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. याच साऱ्या दौऱ्यांचा परिणाम फडणवीस यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे बातम्या येत होत्या, मात्र निव्वळ खोट्या बातम्या आहेत, हे आता स्पष्ट होत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी संवाद साधला, काल ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्याचसोबत त्यांनी ट्विटरवर त्यांनी एका कार्यक्रमाचा व्हिडिओ देखील ट्विट केला आहे. त्यामध्ये उपस्थित जनसमुदायाशी बोलत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT