Devendra Fadnavis News Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : हिंसाचार करणाऱ्यांना सोडणार नाही; फडणवीसांचा गर्भित इशारा

Amol Jaybhaye

,Mumbai News : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी गालबोट लागले. बीडमध्ये दोन आमदारांच्या आणि शासकीय कार्यालयाची जाळपोळ झाली. बीडमधल्या राष्ट्रवादी भवनाचीही तोडफोड झाली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आम्ही सकारात्मक आहोत, मात्र हिंसाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे आंदोलन चालले आहे, त्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मकतेने पाऊल उचलते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) तसे वचनही दिले आहे. राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. मात्र, काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

ज्या प्रकारे बीडमध्ये लोकप्रतिनिधींची घरे जाळणे, विशिष्ट लोकांना टार्गेट करत, प्रतिष्ठानने जाळणे, दवाखाने जाळणे ही कृती काही लोकांनी केली. अशा प्रकारची जी कृती केली आहे ती चुकीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. जिथे शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे तिथे कुठलीही कारवाई केली जाणार नाही. मात्र, हिंसेला कुठेही थारा देणार नाही, असा स्पष्ट इशारा फडणवीस यांनी दिला. जोपर्यंत शांतता प्रस्थापित हो नाही तोपर्यंत पोलिस कारवाई करतील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

काही राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते देखील या हिंसाचारात सहभागी झाल्याचे दिसते. त्यासंदर्भातले सगळे पुरावे मिळाल्यानंतर त्याचीही माहिती तुम्हाला दिली जाईल, असेही फडणवीसांनी सांगितले. काही लोक जाणीवपूर्वक हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. अशा लोकांवर पोलिस कारवाई करणार आहोत. काही लोक सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून धमकी देत आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT