Maratha Aandolan Beed : जाळपोळ, दगडफेकीत बीड जिल्ह्यात 20 कोटींवर नुकसान ; सोळंके-क्षीरसागरांचे सर्वाधिक...

Maratha Reservation News : सर्वाधिक फटका आमदार प्रकाश सोळंके व क्षीरसागरांना बसला आहे.
Prakash Solanke,Sandeep Kshirsagar News
Prakash Solanke,Sandeep Kshirsagar NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ उत्स्फुर्त साखळी उपोषणानंतर बसची जाळपोळ व तोडफोडीनंतर सोमवारी (ता. 30) आंदोलनाने उग्र रुप धारण केले. नेत्यांची घरे, कार्यालये, हॉटेल्स, दुकानांची जाळपोळ आणि तोडफोडीत जिल्ह्यात साधारण 20 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सर्वाधिक फटका आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) व क्षीरसागरांना बसला आहे.

आरक्षण मागणीसाठी जिल्ह्यात गेल्या बुधवार (ता.25) पासून सर्कलनिहाय साखळी उपोषणे सुरू आहेत. यात काही ठिकाणी कॅंडल मार्च, ठिय्या, भजन-कीर्तन अशा स्वरुपाची आंदोलने होत होती. दरम्यान, शनिवारी (ता. 28) रात्री अचानक धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करुन टायर जाळण्यात आले. यानंतर बीड-कोल्हापूर ही बस पेटविण्यात आली. यामुळे परिवहन महामंडळाने बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तरीही दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. 29) दोन बसवर दगडफेक करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash Solanke,Sandeep Kshirsagar News
Maratha Reservation : जरांगे पाटलांची मोठी मागणी होणार पूर्ण?; राज्य सरकारच्या हालचालींना वेग, फडणवीस राज्यपालांना भेटले

सोमवारी (ता. 30) सकाळी जिल्ह्यात नियमित आंदोलने सुरू असतानाच माजलगावला कथित ऑडीओ क्लिपवरुन आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याला हजारो आंदोलकांनी घेराव घातला आणि दगडफेक केली. समोरील दोन चार चाकी व चार दुचाकी जाळण्यात आल्या. बंगल्यातील सर्व खोल्यांतील सर्व टीव्ही संच, खाटा, सर्व काचा फोडल्या. यात तीन ते चार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आंदोलकांनी त्यांचे बंधू धैर्यशिल सोळंके यांच्या बीडमधील उत्तम नगर भागातील बंगल्यासमोरील दुचाकींनाही आग लावली. यात तीन दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तर, फाटक आणि बंगल्याच्या काचांचेही मोठे नुकसान झाले आहे.

एसटी महामंडळाचेही कोट्यवधीचे नुकसान

सर्वाधिक नुकसान बीडमधील क्षीरसागरांच्या बंगल्याचे झाले आहे. बंगल्यासमोरील तब्बल सात चारचाकी व चार दुचाकी वाहने जळून खाक झाली आहेत. यात अद्यायवत अलिशान कारही जळून खाक झाल्या आहेत. यासह बंगल्यातील काही फर्निचर, वॉटर फिल्टर, इन्व्हर्टर आदी विद्युत उपकरणेही जळाली. याचे नुकसानही तीन कोटींच्या पुढे असण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे चार दिवसांपासून बस बंद असल्याने दोन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहेच. शिवाय, महामंडळाची एक बस जाळल्याने तसेच सोमवारी रात्री 57 आणि यापूर्वी दोन अशा 59 बस फोडल्याने तब्बल सव्वा कोटी रुपयांचे हे अधिकचे नुकसान झाले आहे.

Prakash Solanke,Sandeep Kshirsagar News
Maratha Reservation : मराठा आरक्षणावर मोठी अपडेट; जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळासोबत उपसमितीची होणारी बैठक रद्द!

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या सोनाजीराव होमिओपॅथीक महाविद्यालयातील कार्यालय पेटवून देण्यात आले. यातही फर्निचर तसेच इतर साहित्य असे पाच लाखांवर नुकसानीचा अंदाज आहे. समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांचे जालना रोडवरील सनराईज हॉटेलला समोरच्या भागातील आगीत दोन लाखांहून अधिक नुकसानीचा अंदाज आहे. तर, बार्शी रोडवरील राष्ट्रवादी (शरद पवार गट) भवनाला लागलेल्या आगीत संगणक, फर्निचर, खुर्च्या असे 10 लाखांवर नुकसान झाले आहे.

सुभाष रोडवरील मंगेश लोळगे यांच्या दुकानावरील दगडफेक व समोरील दोन दुचाकी जाळल्याने तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आंदोलकांनी सायंकाळी शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचे नगर नाका भागातील कार्यालयावर दगडफेक केली होती. रात्री उशिरा कार्यालयाला आग लावण्यात आली. यात संगणक, फर्निचर, खुर्च्या जळून दहा लाखांच्या नुकसानीचा अंदाज आहे.

शिवसेनेचे (Shivsena) जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या कार्यालयांवर दगडफेक झाली. याच बाजूच्या स्वराज हॉटेलचीही मोठी तोडफोड करण्यात आली. भाजप (BJP) जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या कार्यालयाचेही मोठे नुकसान करण्यात आले. यात चार लाख रुपयांहून अधिक नुकसानीचा अंदाज आहे. शहरातील रिलायन्स ट्रेंड्स व एका दुचाकी शोरुमचेही मोठे नुकसान झाले आहे.

तसेच, माजलगावधील पंचायत समिती, नगर पालिका, आष्टीत तहसिलदारांचे शासकीय वाहन, बीडमधील बीआरएसचे दिलीप गोरे यांचे कार्यालय, बीडची नगर पालिका यांच्या तोडफोड आणि जाळपोळीत मोठे नुकसान झाले. आंदोलकांनी रस्त्यांवरील बॅनरही फाडून जाळले. विशेष, म्हणजे आग विझविण्यासाठी जाणारे अग्नीशमन वाहनही जाळण्यात आले.

Edited by : Amol Jaybhaye

Prakash Solanke,Sandeep Kshirsagar News
Hemant Patil News : खासदारकीचा राजीनामा दिला अन् हेमंत पाटील दिल्लीत उपोषणाला बसले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com