Devendra Fadnavis On Jitendra Awahad : महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि वाद हे जणू काही समीकरणच झाले आहे. गेल्या वर्षी आव्हाड यांच्यावर हर हर महादेव या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर आता आमदार आव्हाड यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे.
देशामध्ये रामनवमी आणि हनुमान जयंती दंगली घडवण्यासाठीच वापर केला जात आहे, असे विधान आव्हाडांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) घाटकोपरमध्ये शुक्रवारी (ता. २१) सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, "रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात त्यामध्ये दंगली होतात. दंगलीमुळे शहरांचे वातावरण अत्यंत विषारी झाले आहे. आगामी वर्ष हे धार्मिक दंगलीचे वर्ष असेल असे माझे स्पष्ट मत आहे." जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त शब्दांमुळे त्यांना महाराष्ट्र मानवाधिकार आयोगानेही नोटीस बजावली आहे.
आता आव्हाडांच्या या विधानावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, हे विधान अतिशय आक्षेपार्ह आहे. राम नवमी असेल, हनुमान जयंती असेल, अत्यंत शांततेने साजरी केली जाते. लोकांच्या मनामध्ये प्रभू श्रीरामांच्या प्रती, आणि हनुमानाच्या प्रती, प्रचंड श्रद्धा आहे. ही श्रद्धा त्या निमित्ताने व्यक्त केली जाते. त्यामुळे दंगलीकरीता हे उत्सव साजरी केली जाते, हा एक प्रकारे समस्त समाजाचा अपमान आहे, राम भक्तांचा अपमान आहे, अशा प्रकारचं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे., असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात भविष्यात दंगली होतील, असं वक्तव्य करणं, याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही काय असं ठरवलंय का दंगली घडवायच्या आहेत का? असा त्याचा अर्थ आहे का? असाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. नेत्यांनी अशा प्रकरणांमध्ये संवेदनशीलपणे व्यक्त झाले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी सनसनाटी निर्माण करणे योग्य नाही, असे फडणवीस म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.