प्रविण डोके :
Pune Bazar Samiti Election : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Pune Bazar Samiti) निवडणुकीच्या घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. कामगार वर्गाची अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीच्या संलग्न संघटनांमधून हमाल-मापाडी गटाच्या एका जागेसाठी तीन उमेदवारांनी शड्डू ठोकले आहेत. खरंतर, या निवडणुकांमध्ये अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष, कामगार नेते डॉ.बाबा आढाव ( Dr. Baba Adhav) यांनी दिलेला उमेदवारच अंतिम मानला जातो. पण यावेळी हमाल पंचायतीसह इतर समितीच्या सलंग्न संघटनांच्या उमेदवारांनीही बंडखोरी केल्याचे पाहायला मिळत आहे.
डॉ.बाबा आढाव यांनी कायम कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला. मात्र,बाजार समिती निवडणुकीनिमित्त आयुष्यभर कामगारांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबांवर आता पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत काही संघटनांनी बाबा आढाव यांचे निर्णय धुडकावून लावले आहेत. त्यामुळे वयाच्या ९३ व्या वर्षीदेखील त्यांच्यावर संघर्ष करण्याची वेळ आली आहे. (Bazar Samiti Election)
अशातच पुणे बाजार समितीच्या निवडणुकी निमित्ताने कामगार संघटनांमधील अंसतोष उफाळून आला आहे.डॉ.बाबा आढाव यांनी कष्टकरी संघर्ष समितीकडून तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरघे यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात कामगार युनियनचे संतोष नांगरे आणि हमाल पंचायतचे सचिव गोरख मेंगडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. हमाल पंचायतीचे अध्यक्ष बाबा आढाव आहे. तर कामगार संघटनेकडून नांगरे यांना उमेदवारी दिल्यानेही कामगार संघटनांनमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे. (Pune Political news)
दरम्यान कधीही पाठीला पोते न लावणार्यानांही बाबा आढावांनी संघटनेचे नेतेपद दिलं, त्यांना मोठं केलं. पण त्यांनीच बाबा आढावांनीदिलेल्या उमेदवाराला विरोध केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बाबा आम्हाला देवासारखे. बाबामुळेच आम्हा कष्टकऱ्यांचे आयुष्य उभे राहिले आहे. अस म्हणत संघटनेची पदे उपभोगणाऱ्यांनी मात्र बाजार समितीच्या निवडणुकीत आढाव यांना विरोध केला आहे. पण आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये बाबा आढावांनी दिलेलाच उमेदवार निवडून आल्याचे हा इतिहास आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणता उमेदवार निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.