Nitin Gadkari, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Bjp News Mumbai : देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींची मुंबईत बैठक; चर्चेचा विषय गुलदस्त्यात

Sachin Fulpagare

Maharashtra Politics : मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या आमदारांची आज संध्याकाळी बैठक होणार आहे. या बैठकीसाठी हालचाली सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची त्यापूर्वी बैठक होणार आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी यांचीही मुंबईत बैठक झाल्याचं सांगण्यात येत आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करत सरकारला दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. या आंदोलनाने मराठा समाजाचा रोष वाढला आहे. आता हा रोष करण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून होऊ शकतो. विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली होती. त्यांची ही मागणी सर्वपक्षीय मराठा आमदारांनीही लावून धरली, पण अद्याप या अधिवेशनाबाबत निर्णय झालेला नाही. या मुद्द्यावर महायुतीच्या आमदारांच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. आता ही सुनावणी नियमित घेणार असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तसंच ३१ डिसेंबरपर्यंत सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे संकेतही नार्वेकर यांनी दिले आहेत. या सुनावणीचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सर्व घडामोडी पाहता आणि आज संध्याकाळी होत असलेल्या महायुतीच्या आमदारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बैठक होत आहे. महायुतीच्या बैठकीत चर्चेला येणाऱ्या विविध विषयांवर काय भूमिका घ्यायची, याची चर्चा अजित पवार गटाच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. ही बैठक संध्याकाळी ५ वाजता होणार असल्याचं सांगण्यात येत आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुंबईत बैठक झाली. सह्याद्री अतिथिगृहावर त्यांची बैठक झाली. दुपारी २.४५ च्या सुमारास ही बैठक सुरू झाली, असं सांगण्यात येत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये कुठल्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली, हे मात्र समजू शकलेलं नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT