Maharashtra Politics : महायुतीच्या आमदारांची ‘वर्षा’वर खलबतं; मुख्यमंत्री देणार कानमंत्र

Mahayuti News : इच्छुक आमदार या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर आपलं म्हणणे मांडण्याची शक्यता आहे.
Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit Pawar
Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यात यश मिळविलेल्या महायुतीची आज (ता. ३ नोव्हेंबर) सायंकाळी वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे. यात साहजिकच मराठा आरक्षणावर चर्चा होईल. त्याचरोबरच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय बोलणे होते का, याचीही उत्सुकता असणार आहे. आगामी निवडणुकीच्या रणनीतीबाबत खलबतं रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, त्यात मुख्यमंत्री काय कानमंत्र देतात, हेही पाहावे लागणार आहे. (Meeting of MLAs of Mahayuti at 'Varsha' in the presence of CM )

दरम्यान, महायुतीच्या आमदारांची बैठक होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदारांची स्वतंत्र बैठक होणार आहे. त्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात अजित पवार गटाची भूमिका मांडली जाणार आहे, त्यामुळे महायुतीच्या बैठकीआधी राष्ट्रवादीच्या बैठकीत काय ठरतं, हे याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit Pawar
Kolhapur Water Supply Issue : कोल्हापूरच्या थेट पाइपलाइनच्या मुख्य वीजपंपाची वायर कापली; घटनेमागे राजकारण असल्याची चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी सहा वाजता वर्षा निवासस्थानी महायुतीच्या आमदारांची बैठक होणार आहे. त्याअगोदर सायंकाळी पाच वाजता अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक होणार आहे. त्यात महायुतीच्या बैठकीत काय भूमिका घ्यायची, यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यांना काही सूचना पक्षाकडून दिल्या जाणार आहेत. तसेच, मराठा आरक्षणावर अजित पवार गट आपली भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापला आहे. अनेक लोकप्रतिनिधींना आपले कार्यक्रम रद्द करावे लागले. बीडमध्ये तर आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवून देण्यात आले होते. त्यामुळे अनेक आमदार-खासदारांना घेराव घालण्यात आला. संतप्त मराठा आंदोलकांमुळे लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले होते. त्याची चर्चा महायुतीच्या बैठकीत होऊ शकते. तसेच, मराठा आरक्षण कशा पद्धतीने देण्यात येणार आहे, याचीही माहिती मुख्यमंत्री शिंदे हे आमदारांना देतील.

Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit Pawar
Bidri Sugar Factory Election : कोल्हापूरच्या राजकारणात चमत्कार; ‘बिद्री’च्या छाननीवेळी कट्टर विरोधक बसले मांडीला मांडी लावून

गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, अशी चर्चा रंगली होती. त्यात नवरात्रीचा मुहूर्तही सांगण्यात आला होता. मात्र, नवरात्री संपून आता दिवाळी आली तरी विस्ताराची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे इच्छुक आमदार या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर आपलं म्हणणे मांडण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit Pawar
Ravindra Waikar : ठाकरे गटाच्या आमदाराला झटका; ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com