Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis: दिवाळीत फडणवीसांनी पहिला 'बॉम्ब' फोडला! रवी राजा यांच्या भाजप प्रवेशानंतर दिले मोठे संकेत

Ravi Raja joins BJP: रवी राजा यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा राजीनामा दिल्याने त्यांचा फटका काँग्रेसला निवडणुकीत बसेल, असे राजकीय जाणकरांचे म्हणणं आहे.

Mangesh Mahale

Mumbai News: मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचा सोडचिठ्ठी देऊन हाती कमळ घेतले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थित त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

रवी राजा यांच्या प्रवेशानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषदेत मोठा 'बॅाम्ब' टाकला आहे. अनेक बडे नेते रवी राजा यांच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेत दांडगा जनसंपर्क असलेल्या रवी राजा यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा राजीनामा दिल्याने त्यांचा फटका काँग्रेसला निवडणुकीत बसेल, असे राजकीय जाणकरांचे म्हणणं आहे.

रवी राजा यांनी साथ सोडल्यानं मुंबईत काँग्रेसला मोठा दणका बसला असल्याचे बोलले जाते. रवी राजा यांच्यानंतर अनेक बडे नेते भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचे संकेत फडणवीसांनी दिले आहे. निवडणुकीनंतर महायुतीचेच सरकार स्थापन होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रवी राजा हे मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते. सायन कोळीवाडा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ते इच्छुक होते. पण काँग्रेसने त्यांना तिकीट दिले नाही. त्यामुळे नाराज असलेले रवी राजा यांनी काँग्रेसची साथ सोडली. सायन कोळीवाडा परिसरात त्यांचा प्रभाव आहे. त्यांचा फायदा आता निवडणुकीत भाजपला होईल.

सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून गणेश यादव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली, त्यामुळे रवी राजा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे.

सायन कोळीवाडा मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडून ३ जण इच्छुक होते. यामध्ये रवी राजा, काँग्रेसचे मुंबई सचिव अमित शेट्टी आणि काँग्रेसचे सचिव गणेश यादव यांचा समावेश होता. रवी राजा यांना उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. पण काँग्रेसने गणेश यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. आपण काँग्रेसमधील 44 वर्षांचा राजकीय प्रवास थांबवत असल्याचे रवी राजा यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

कोण आहेत रवी राजा

  • 1980 मध्ये युवक काँग्रेसपासून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली होती.

  • काँग्रेसचे नेते म्हणून रवी राजा यांनी मुंबई महापालिका गाजवली आहे.

  • महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून ते नेहमी त्यांनी आक्रमक भूमिका रवी राजा यांनी मांडली.

  • पाचवेळा सातत्यानं रवी राजा महापालिकेत निवडून आले.

  • 23 वर्षे बेस्टचे सदस्य असा त्यांच्या नावावर विक्रम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT