Mahayuti News : जंगल नया है, शेर वही है ; फडणवीसांचे 16 शिलेदार अजितदादा-शिंदेंकडून मैदानात

BJP Leaders Candidature in Shivsena & Ajit Pawar NCP: संजय काका पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, राजकुमार बडोले, निशिकांत पाटील या भाजपमधून आलेल्यांना अजितदादांनी तिकीट दिले आहे.
Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Vidhan Sabha: महायुती-आघाडी दोन्हीकडे तीन प्रमुख पक्ष असल्याने तिकीट वाटपावरुन रस्सीखेच झाली. तिकीट नाकारलेल्या अनेकांनी बंडखोर केली आहे.अजित पवार यांनी भाजपमधून आलेल्या 4 नेत्यांना तिकीट देत निवडणुकीच्या (Maharashtra Vidhansabha Election) रिंगणात उतरवले आहे.

संजय काका पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, राजकुमार बडोले, निशिकांत पाटील या भाजपमधून आलेल्यांना अजितदादांनी तिकीट दिले आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केलेल्या भाजपचे 12 दिग्गज नेते शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानसभा लढत आहेत.

विधानसभा निवडणुकीत बंडोबा अद्याप थंड न झाल्याने सर्व पक्षीय नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत असताना काही ठिकाणी ‘मैत्रीपूर्ण लढत’होईल, असे सध्याचे चित्र आहे.

राज्यातील सहा प्रमुख पक्षामधील अनेक इच्छुकांनी दुसऱ्या पक्षात उड्या मारल्या आहेत. दुसऱ्या पक्षात गेलेल्या काहींना संबधीत पक्षाने संधी दिली आहे. तर तिकीट न मिळाल्याने काही जण पश्चाताप करीत आहेत.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Mahayuti Politics : शिंदे, फडणवीस अन् अजितदादा ‘या’ दोन मतदारसंघात करणार नाहीत एकत्रित प्रचार?

भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या या नेत्यांना शिंदेंनी दिले तिकीट

  1. रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव (कन्नड विधानसभा मतदारसंघ)

  2. माजी खासदार निलेश राणे (कुडाळ-मालवण मतदारसंघ)

  3. राजेंद्र गावीत (पालघर )

  4. संतोष शेट्टी (भिवंडी पूर्व)

  5. मुरजी पटेल (अंधेरी पूर्व )

  6. अजित पिंगळे (धाराशिव )

  7. दिग्वीजय बागल (करमाळा)

  8. विठ्ठल लंघे (नेवासा)

  9. बळीराम शिरसकर (बाळापूर)

  10. विलास तरे (बोईसर)

  11. अमोल खताळ (संगमनेर )

  12. शायना एन सी (मुंबादेवी )

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Maharashtra BJP: बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजपचा प्लॅन ठरला; नेत्यांची तब्बल तीन तास बैठक

कमळ सोडून हाती घड्याळ बांधणारे हे आहेत अजितदादांचे उमेदवार

  1. प्रताप पाटील चिखलीकर (लोहा)

  2. निशिकांत पाटील (इस्लामपूर)

  3. राजकुमार बडोले (अर्जुनी मोरगाव)

  4. संजय काका पाटील (तासगांव-कवठेमहांकाळ)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com