Devendra Fadnavis On Indu Mill  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis On Indu Mill : 'पुढील महापरिनिर्वाण दिनाला इंदू मिलच्या जागेवर...'; फडणवीसांचं मोठं विधान!

Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day News : "भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. याचे श्रेय बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला जातं."

Chetan Zadpe

Mumbai Political News : संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (6 डिसेंबर) ६७ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे उपस्थित होते. याप्रसंगी भाषण करताना फडणवीस यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नियोजित इंदू मिलवरील स्मारकाबाबत महत्त्वाचं भाष्य केले आहे. (Latest Marathi News)

यावेळी फडणवीस म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केला की, मला कुठलाही धर्मग्रंथापेक्षा संविधान हे अधिक महत्त्वाचं आहे. अनेक वर्षे इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व्हावं, अशी मागणी होती . तशी अनेक आंदोलनं झाली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मला या गोष्टीचं समाधान आहे"

फडणवीस पुढे म्हणाले, "माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात आम्ही मोदीजींना विनंती केली आणि इंदू मिलची जागा आपल्याला मिळाली. आज भव्य स्मारकाचं निर्माण तिथे होत आहे. मला अपेक्षा आहे आणि आपला प्रयत्न आहे की, पुढच्या महापरिनिर्वाण दिनाला आपण या ठिकाणी येऊ, त्यावेळेस बाबासाहेबांच्या स्मारकाला देखील आपल्याला अभिवादन करता आलं पाहिजे. त्यासाठी अतिशय वेगाने काम करण्याचा प्रयत्न आम्ही करू," असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले, "आज भारत अतिशय वेगाने प्रगती करतोय. आजच्या क्षणाला आपण जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहोत. मात्र, भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. याचे श्रेय जर कुणाला जात असेल, ते खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला जातं."

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT