Sharad pawar, Devendra Fadnavis  sarkarnama
मुंबई

Supreme Court Final Decision : पवारांचा नैतिकतेशी काय संबंध?; त्यांच्याबाबत सांगायचे तर वसंतदादा पाटलांपासूनचा इतिहास..

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Reaction On Supreme Court Verdict : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात 'नैतिकता' हा शब्द सध्या नेहमीच उच्चारला जात आहे. विरोधक आणि सत्ताधारी याच्यात 'नैतिकता'या शब्दावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत सत्तास्थापन केली. तेव्हापासून राज्यातील राजकारणात हा शब्द परवलीचा बनला.

सुप्रीम कोर्टानं गुरुवारी सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत दिलेल्या निकालावरुन पुन्हा या शब्द सतत ऐकायला मिळत आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर त्यांच्या नैतिकतेवरुन हल्लाबोल केला होता. "एकनाथ शिंदे यांनी नैतिकतेला जागून राजीनामा दिला पाहिजे,"अशा शब्दात न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं आहे.

त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना, " "नैतिकता आणि भाजपचा काही संबंध आहे असे वाटत नाही. राज्यपालांची भूमिका ही चुकीचीच होती. राज्यकर्त्यांबाबत कोर्टाने तीव्र भूमिका मांडली. आता आम्ही तिन्ही पक्ष म्हणून एकत्र काम करू, आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय येणे अद्याप बाकी आहे." असे सांगितले.

पवारांनी केलेल्या टीकेवरुन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर फडणवीसांनी पवारांना चांगलंच सुनावलं. "शरद पवार यांचा नैतिकतेशी काहीही सबंध नाही, त्यांच्या नैतिकतेबाबत सांगायचे तर वसंतदादा पाटील यांच्यापासून इतिहासात जावे लागेल," अशा मोजक्या शब्दात फडणवीसांनी पवारांना फटकारलं.

न्यायालयाच्या निर्णयावर काल शरद पवारांनी भाजपला जोरदार सुनावलं होतं. ते म्हणाले, "निकालात एक महत्त्वाची बाब दिसते, विधिमंडळ हे अंतिम नाही. राजकीय पक्षाचा आदेश अत्यंत महत्त्वाचा आहे असे सांगितलेलं दिसत आहे. मला वाटतं अद्याप काही निर्णय व्हायचे आहेत."

आजच्या पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, "सध्या अस्तिवात असलेले सरकार बेकायदेशीर आहे. शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. या सरकारला मिळालेले जीवनदान तात्पुरतं आहे. मी नैतिकतेनुसार राजीनामा दिला, या सरकारनेही नैतिकतेनुसार राजीनामा दिला पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

"ज्या पक्षाने ज्यांना सर्वकाही दिलं, जे हापापलेले होते त्यांनी अविश्वास आणला हे काही योग्य नाही असं ते यावेळी म्हणाले. आता थोडीतरी नैतिकता असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात काही नैतिकता असेल तर त्यांनी लगेच राजीनामा द्यावा," असे ठाकरे म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT