Uddhav Thackeray says mlas disqualification : सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत आता विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार आहेत, याबाबत निर्णय काल (गुरुवारी) सुप्रीम कोर्टानं दिला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता याबाबत कधी निर्णय घेतात, याकडे सगळ्याचे लक्ष लागेल आहे. या विषयावर आज ठाकरे गटाचे पक्षपप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नार्वेकरांना थेट इशारा दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले, "सोळा आमदार अपात्र झाल्यानंतर ४० जणांची मते वजा केली तर अध्यक्षही बेकायदेशीर ठरतील. आमदार अपात्रतेच्या सुनावणीला विलंब लावू नये, अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतला तर आम्ही कोर्टात जाऊ,"
मेलेला पोपट हातात घेऊन मिठुमिठु करत आहेत..
"मी राजीनामा दिला नसता तर मला पुन्हा मुख्यमंत्री होता आले असते, असे निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. मात्र मला यात स्वारस्य नाही. नैतिकतेला जागून मी राजीनामा दिला. सध्याचं सरकार बेकायदेशीर आहे त्यांनी देखील आता राजीनामा द्यावा. काही जण मेलेला पोपट हातात घेऊन मिठुमिठु करत आहेत. अध्यक्ष त्यांच्या परिने निर्णय घेतीलच. ते सध्या परदेशात आहेत. लवकरात लवकर येऊन त्यांनी निकाल लावावा," असे ठाकरे म्हणाले.
काही वेडंवाकडं केलं तर आम्ही कोर्टात..
"पक्ष आणि पक्ष चिन्ह आमच्याकडून काढून घेतल्याने आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात गेलो. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या निकाल देताना इकडे काही वेडंवाकडं केलं तर आम्ही कोर्टात जाऊ. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत, असा इशारा देतानाच त्यानंतर जी बदनामी होईल, त्यामुळे यांना जगात तोंड दाखवायाल जागा राहणार नाही. अध्यक्षांनी परदेशातून यावं आणि निकाल लावावा," असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
सर्व पुरावे विधानसभेत..
ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री अनिल परब म्हणाले, "आमदार अपात्रेबाबत अध्यक्षांनी पंधरा दिवसात निर्णय घ्यावा, असे पत्र आम्ही त्यांना देणार आहोत. सुनील प्रभु यांच्या व्हिपचे उल्लंघन केल्याने हे आमदार अपात्र ठरणार आहेत. त्यावेळेची परिस्थिती, याबाबतचे सर्व पुरावे विधानसभेत आहे. त्यांच्याआधारे अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा. अध्यक्षांनी घेतलेले निर्णय दहाव्या सुचीच्या विरोधात आहे, "
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.