Maharashtra Monsoon Session
Maharashtra Monsoon Session sarkarnama
मुंबई

Monsoon Session : मेटेंचा अपघात कशामुळे झाला ? ; फडणवीसांनी विधानसभेत दिलं उत्तर..

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे (Vinayak Mete)यांच्या अपघाती निधनावर आज पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली. विनायक मेटेंच्या अपघाताची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरु आहे. तरी विरोधी पक्षासह शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या शंका उपस्थित करण्यात येत आहे. कॉंग्रेस आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Session)

मेटेंच्या अपघाताचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे एक्स्प्रेस वेवर मेटेंच्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात झाल्याची माहिती दिली. फडणवीस यांनी मेटेंच्या चालकाबद्दलही संशय व्यक्त केला आहे.

गायकवाड यांनी विधानसभेत विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत लक्षवेधी उपस्थित केली. या लक्षवेधीमध्ये विनायक मेटे यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाही. वेळेवर रुग्णवाहिका येत नाही, असा आक्षेप घेण्यात आला. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर खुलासा केला आहे.

फडणवीस म्हणाले, "'मुंबई पुणे एक्स्प्रेसवर भल्या पहाटे मेटे हे मुंबईकडे येत होते. त्यावेळी एक्स्प्रेसवर एक मोठा ट्रॉलर हा शेवटच्या लेनमध्ये चालला होता, जो मधल्या लेनमध्ये चालला होता. त्यामुळे मेटे यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी जागा मिळत नव्हती. त्यामुळे काही काळ मेटेंच्या चालकाने प्रयत्न केला. पण, जागा कमी असल्यामुळे त्यांना ओव्हरटेक करता आले नाही. त्यानंतर पुढे जाऊन ट्रॉलर तिसऱ्या लेनमध्ये गेला आणि तिसऱ्या लेनमध्येही ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला तिथेही समोर एक गाडी होती. तिथे जागा कमी होती, पण तिथूनही ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि ते अतिशय चुकीचे जजमेंट होते. त्यामुळे गाडी ट्रॉलरला धडकली. कारच्या ज्या बाजूने अंगरक्षक आणि विनायक मेटे बसले होते, त्याबाजून कार धडकली '

"मेटेंच्या चालकाने फोन केल्यानंतरही वेळेत मदत पोहचली नाही, असं म्हटलं गेलं आहे. मात्र चालकाने सांगितल्याप्रमाणे नवी मुंबई आणि रायगड पोलीस त्यांच्या रस्त्यात शोध घेत होते. पण अपघाताची लोकेशन (Location) कळू शकत नव्हती. त्यामुळे यंत्रणा बदलणं गरजेचं आहे," असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, "पोलीस जेव्हा सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना कुणीच दिसले नाही. पुढे आणखी एक दीड किलोमीटर पोलीस गेले, तिथेही त्यांना कुणी आढळलं नाही. त्यामुळे मेटेंच्या चालकाने फोन खरा केला की खोटा केला, असा प्रश्ननिर्माण झाला होता. तेवढ्यात पोलिसांनी पुन्हा त्याला फोन केला, तेव्हा तो रायगड पोलिसांच्या हद्दीत अपघाताचे ठिकाण होते. तोपर्यंत आरबीआयची गाडी तिथे 7 मिनिटांमध्ये पोहोचली होती. मेटेंना रुग्णालयात घेऊन गेले, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. आता मेटेंचा मृत्यू जागेवर झाला की वाटेत नेत असताना झाला, याची चौकशीअंती समोर येईल,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT