…मग मुख्यमंत्रीही जनतेतून करा ना, तुमचाच निर्णय का बदलताय ? अजितदादांची टोलेबाजी

Maharashtra Assembly : केवळ अडीच वर्षांत एखादा मंत्री आपली भूमिका बदलू शकतो का, परस्परविरोधी विधाने करु शकतो का?
Maharashtra Assembly Live update
Maharashtra Assembly Live updatesarkarnama

मुंबई :सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर आज अधिवेशनाच्या (maharashtra assembly) कामकाजास सुरुवात झाली.राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनचा आज तिसरा दिवस आहे. विविध मुद्द्यांवरुन आज विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (eknath shinde)घेरलं. नगराध्यक्ष तसेच सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याबाबतच्या विधेयकांवरुन राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांची कोंडी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगराध्यक्ष तसेच सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यासंदर्भातील विधेयक सभागृहात मांडले. या विधेयकावर विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवारांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. अजितदादांनी थेट नगराध्यक्ष निवडीवरून एकनाथ शिंदेंनाच लक्ष्य केलं.

"शिंदे अडीच वर्षांपूर्वी आमच्यासोबत होते, तेव्हा नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून त्यांनीच नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड करण्यासंबंधीचे विधेयक मांडले होते. केवळ अडीच वर्षांत एखादा मंत्री आपली भूमिका बदलू शकतो का, परस्परविरोधी विधाने करु शकतो का? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे," असा सवाल जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना केला.

Maharashtra Assembly Live update
समर्थ रामदासांच्या जन्मगावातील मूर्ती चोरीबाबत फडणवीसांचे विधानसभेत कारवाईचे आदेश

"तुम्ही थेट नगराध्यक्ष जनतेतून करायचं म्हणताय, मग मुख्यमंत्रीदेखील जनतेतून करा ना. मुख्यमंत्री जनतेतून केला असता तर तेही चाललं असतं. तुमच्या हातामध्ये आहे म्हणून ते वेगळं करणार काय?, तुम्ही तुमचाच निर्णय का बदलताय? असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.

आम्ही जागे आहोत..

अजित पवार म्हणाले, " नगरपालिकेच्या निवडणुका कशा प्रकारे होतात तुम्हाला माहीत आहे. काय काय ठिकाणी घरात किती मतं आहेत, मग कोण फ्रीज देतंय. कोण टीव्ही देतंय, रात्र रात्र जागून काढतात, आपण जर फिरत असलो तर ते खाकरतात आणि म्हणतात आम्ही जागे आहोत, बरं का आम्ही जागे आहोत. म्हणजे शेवटच्या दोन दिवस झोपतसुद्धा नाहीत. हे सगळ्यांना माहीत आहे,"

मुख्यमंत्र्यांना विनंती..

"माझी एकनाथ शिंदेंना नम्रतेची विनंती आहे. नगराध्यक्ष हा नगरसेवकांमधून व्हायला हवा. राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपालिका सक्षम नाहीत, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तिथे लक्ष देत नाही आणि नगराध्यक्षाची निवडणूक थेट जनतेतून आपण करतोय," असे अजित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com