Mumbai News : राज्यातील टोल नाक्यांवरून पुन्हा खडाखडी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी टोलच्या संदर्भात केलेल्या विधानावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. फडणवीस हे धादांत खोटे बोलत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. त्याला फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. (Devendra Fadnavis' reply to Raj Thackeray's allegation with statistics)
राज्यातील टोल नाक्यांवरून चारचाकी, तीनचाकी आणि छोट्या गाड्यांकडून टोल वसूल केला जात नाही, असे विधान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. तो व्हिडिओ दाखवून राज ठाकरे यांनी ‘फडणवीस हे धादांत खोटे बोलत आहेत’, असे सांगून मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आमचे महाराष्ट्र सैनिक टोल नाक्यांवर उभे राहून चारचाकी वाहने सोडतील. ती सोडली नाही तर टोल नाके पेटवून देतील, असा इशारा दिला होता.
राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तातडीने उत्तर देण्यात आलेले आहे. त्यात म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. ८ ऑक्टोबर) राज्यातील टोलमाफीसंदर्भात एक विधान केले होते. त्याबाबत माध्यमांमधून नेमक्या निर्णयासंदर्भात विचारणा होते आहे. त्याबाबतची माहिती अशी आहे.
ता. ३१ मे २०१५ रोजी मध्यरात्री १२ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ३८ टोल नाक्यांपैकी ११ टोल नाक्यांवरील, तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ५३ पैकी एका टोल नाक्यावरील अशा एकूण १२ टोल नाक्यांवरील टोलवसुली बंद करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरित २७ टोल नाके तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची २६ टोल नाके अशा एकूण ५३ टोल नाक्यांवरही कार, जीप आणि एसटी महामंडळाच्या बसेस अशा वाहनांनाही ३१ मे २०१५ रोजी मध्यरात्री १२ पासून टोलमध्ये सवलत देण्यात आलेली आहे.
यासंदर्भात सरकार संबंधितांना नुकसानभरपाईही देणार आहे. त्याचा निर्णयसुद्धा २०१७ मध्ये घेण्यात आला होता आणि त्याचे परिपत्रक ३१ ऑगस्ट २०१७ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.