Devendra Fadnavis : मुंबई : शिंदे सरकारच्या खातेवाटपामध्ये सर्व महत्त्वाची खाती भाजकडे (BJP) गेली. शिंदे गट फक्त नावालाच आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी केली होती. तसेच भाजपच्या खात्यांना 80 टक्के निधा आहे तर शिंदे गटाकडील खात्यांना फक्ट २० टक्के निधी आहे, असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले.
उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले, भाजपचे 115 आमदार आहेत, एकनाथ शिंदे यांच्यासोहत 50 आमदार आहेत. त्यामुळे 60 टक्के निधी भाजपच्या खात्याना आहे. तर 40 टक्के निधी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेला (SHivsena) फक्त 12.80 टक्के मिळाला होता, असेही त्यांनी सांगितले. आता 40 टक्के निधी शिंदे गटाला दिला आहे, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. मात्र, गृह, अर्थ, महसूल, आदिवासी कल्याण आदी महत्त्वाची खाची भाजपकडे आहेत.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यावेळी विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, ठाकरे यांनी अद्याप राजीनामा दिल्या नसल्याचे समोर आले आहे. यावरुन देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्याची घोषणा बंद खोलीत केली असावी, असा खोचक टोला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.