Ajit Pawar News in Marathi, Devendra Fadnavis news Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : निधीवाटपात देवेंद्र फडणवीसांचा अजितदादांवर 'भरवसा'

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवारांनी आपल्या गटातील आमदारांना २५-२५ कोटींचा निधी वाटला. यावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये कोलित टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेनेच्या आमदारांनाही (शिंदे गट) आमदारांनाही निधी मिळाल्याचे सांगून शिंदेगटाच्या आमदारांनी समाधान व्यक्त केले. निधीवाटताना अजितदादांनी भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघासाठी निधी दिला का? असा प्रश्न विचारला त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडली आणि सत्तेतील तिन्ही पक्षाच्या आमदारांना निधी मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

विधीमंडळात सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ अजित पवारांनी त्यांच्या आमदारांना निधी दिला नाही. तर भाजप शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांनाही निधी दिला आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निधीला घेऊन आरोप करणे योग्य नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राज्यातल्या अनेक भागात अतिवृष्टी सुरु आहे. काही ठिकाणी महिन्याभरात जेवढा पाऊस पडतो तेवढा दोन दिवसात झाला. त्या पाण्याचा तितक्या वेगाने निचरा होत नाही म्हणून सगळीकडे अलर्ट दिला आहे. हवामान विभागाकडून जो अलर्ट मिळतो त्यानुसार एनडीआरएफ व एसडीआरफ वेळेत पोहचत आहे. सध्या प्रशासनअलर्ट मोड आहे. या पसावामुळे पिकांचे नुकसान झाले. ज्या भागात नुकसान झाले तेथे ताबोडतोब पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे, असल्याचेही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अजितदादांच्या या भूमिकेमुळे सव्वा वर्ष निधीकडे डोळे लावून बसलेले आमदार खूष झाले. शिंदे गटाच्या नेत्यांनीही आम्हाला निधी मिळाला, असे सांगून अजितदादांबाबत समाधानी असल्याचे दाखवून दिले आहे. यातून, आमदारांना मोठी लॉटरी लागली आहे. नवे अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या बंडखोरीत साथ दिलेल्या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला आहे.

आमदारांच्या मतदारसंघातील विकासासाठी अजित पवार भाजपसोबत (BJP) सत्तेत सामील झाले. अर्थ खाते मिळताच त्यांनी आमदारांकडून मतदारसंघातील विकासकामांची यादीही मागवली होती. त्यानंतर विधीमंडळात सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांतील विकासकामांसाठी पुरेशी तरतूद केली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT