SIR Maharashtra protest news : देशात सुरू असलेली SIR प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात रविवारी ठाकरे बंधूंनी मुंबईत गर्जना मोर्चा काढला. या मोर्चामध्ये महाविकास आघाडीतील घटकपक्षही सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांत सत्ताधारी भाजपसह निवडणूक आयोगावर जोरदार शरसंधान साधले.
एकाकडे ठाकरे बंधूंची गर्जना सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIR का महत्त्वाचे आहे?, याबाबत सोशल मीडियात पोस्ट केली आहे. ‘एक नागरिक, एक मत’ या तत्त्वाला बळ देण्यासाठी अचूक आणि अद्ययावत मतदार यादी अत्यंत महत्त्वाची आहे. SIRच्या माध्यमातून मतदार यादीतील नोंदींचे पुनरीक्षण करून निवडणूक प्रक्रियेत अधिक अचूकता आणि विश्वासार्हता आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी एसआयआरचे महत्व सांगणार ठळक आठ मुद्दे पोस्टमध्ये नमूद केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मतदार यादी अधिक अचूक ठेवण्याचा उद्देश SIR प्रक्रियेमागे आहे. मतदार यादीतील मृत व्यक्तींच्या नोंदी ओळखून त्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. दुबार नोंदी ओळखून मतदार यादीतील पुनरावृत्ती दूर करण्याचे काम करण्यात आले आहे, असे पहिले तीन मुद्दे आहेत.
अनुपस्थित किंवा स्थलांतरित मतदारांच्या नोंदींचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. मतदार यादीतील नोंदी नियमितपणे अद्ययावत राहणे ही अचूक निवडणूक व्यवस्थेसाठी महत्त्वाची बाब आहे. पात्र मतदारांची नावे कायम राहावीत आणि अपात्र नोंदी दूर व्हाव्यात, यासाठी ही प्रक्रिया उपयुक्त आहे, ही तीन कारणेही CM फडणवीस यांनी सांगितली आहेत.
मतदारसंघातील वास्तविक मतदारांची अचूक नोंद उपलब्ध असणे ही सक्षम निवडणूक व्यवस्थेची गरज आहे. मतदारांनी आपली माहिती तपासून आवश्यक दुरुस्ती किंवा अद्ययावत माहिती देण्यासाठी SIR ही एक महत्त्वाची संधी असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. SIR प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होऊन आपली लोकशाही अधिक सक्षम करूया, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.