Sanjay Raut,  Devendra Fadnavis    Latest news
Sanjay Raut, Devendra Fadnavis Latest news  Sarkarnama
मुंबई

राऊतांना शिव्या देऊ नका, सत्ता येण्यात त्यांचा वाटा मोठा ; फडणवीसांचा टोमणा

सरकारनामा ब्युरो

पनवेल : पनवेल येथे भाजप प्रदेश कार्यकारीणीची आज (शनिवारी) बैठक झाली. यावेळी भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी शिवसेना, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत (sanjay raut), महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (Devendra Fadnavis news update)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला मागे नेले. सरकारनं अनेक योजनांवर स्थगिती आणली. त्यामुळे हे स्थगिती सरकार होते का, असा प्रश्न निर्माण होतो. गेल्या अडीच वर्षात राज्याचा विकास थांबला होता, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अघोषित आणीबाणी होती,"

"हे परिवर्तन सत्तेसाठी नाही तर राज्यातील जनतेच्या सुटकेसाठी, त्यांना मोकळा श्वास घेता यावा, यासाठी हे परिवर्तन आहे. दुराचार,अनाचार, भ्रष्टाचार याविरुद्ध आपण अडीच वर्षे संघर्ष करीत होतो. आघाडी सरकारची अवस्था पाहिल्यावर वाईट वाटायचे.हे सरकार यावे ही 'श्रीं' ची इच्छा होती. ईश्वराला आपण मानतो पण हे सरकार यावं हे लोकांची इच्छा होती, आज खरं हिंदुत्ववादी सरकार आले आहे" असे फडणवीस म्हणाले.

"आमचे जे हिंदुत्व आहे ते कुठल्याही धर्माचे लागूनचालन करणार नाही. आम्ही सर्वाना समान वागणूक देऊ. आता 'यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे,'असे नेहमीचे डायलॉग सुरू होतील.पण मुंबईला कोणीही महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची हिंमत कुणाच्या बापाची नाही," असे फडणवीस म्हणाले.

"एकनाथ शिंदे हे २४ तास काम करणारे नेते आहे, शिंदे मुख्यमंत्री अचानक नाही, तर ते ठरवून झाले आहेत. मंत्रीमंडळाचे विस्तार लवकरच होईल, मंत्रीपदासाठी तडजोड करावी लागेल," असे फडणवीसांनी नमूद केलं. "शेतकऱ्यांना पिकांच्या विम्याची रक्कम मिळाली नाही, आघाडी सरकारमध्ये शेतकऱ्यांना नव्हे तर विमा कंपन्यांचा फायदा झाला," असा आरोप फडणवीसांनी केला.

फडणवीस यांनी यावेळी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. फडणवीस हे राऊतांबाबत बोलत असताना सभागृहातील कार्यकर्त्यांकडून जोरजोरात घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी फडणवीसांनी संजय राऊत यांचे आभार मानण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.

"राऊतांनी सतत भाजपवर टीका केली, त्यामुळे राज्यात सत्तात्तर झाले. राज्यात शिंदे सरकार येण्यामागे राऊतांचा मोठा वाटा आहे, सकाळी नऊ वाजता बोलणारे आता कमी बोलू लागले, त्याचे काय कारण आहे मला माहित नाही. तुम्ही त्यांना शिव्या देवू नका प्लीज. त्यांचे आभार माना. हे सरकार येण्यात त्यांचा जेवढा वाटा तेव्हा इतर कुणाचाच नाही," असा टोला फडणवीसांनी यावेळी राऊतांना लगावला.

"राज्यातील जनतेला त्यांनी वैताग आणला. शिवसेनेला त्यांनी वैताग आणला. सगळ्यांना त्यांनी वैताग आणला. त्यामुळे सगळ्यांनी मिळवून ठरवलं की, हे 'लाऊडस्पीकर' बंद करायचं असेल तर सत्ता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही,"अशा शब्दात फडणवीसांनी राऊतांची खिल्ली उडवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT