Devendra Fadnavis | Uddhav Thackeray | Sanjay Raut
Devendra Fadnavis | Uddhav Thackeray | Sanjay Raut  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : 364 दिवस शांत राहा, एकदाच शिमगा केला तरी चालेल ; फडणवीसांची ठाकरेंवर टीका !

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच कोकणमधील खेड येथे सभा घेतली होती. या सभेतून ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला होता. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही भाजपवर जोरदार टीका केली होती. यावर आता फडणवीसांनी खोचक सूरात प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना खोचक सूरात टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले, "उत्तर भारतामध्ये होळीच्या दिवशी शिमगा करण्याची पद्धत आहे. पण, आपल्याकडे काही लोक मात्र 365 दिवस शिमगा करण्याचा प्रयत्न करतात. मला त्यांना एवढेच सांगावसं वाटतं की, तुम्ही 364 दिवस शांत राहा, एखाद दिवशी शिमगा केला तरी चालेल," असे त्यांनी नाव न घेताच खोचकपणे टोला लगावला आहे.

दरम्यान, 2024 ला उद्धव ठाकरे हे विरोधी आघाडीकडून पंतप्रधानपदासाठीचा चेहरा असतील का? यावर राऊतांनी भाष्य केले होते. ''याबाबत आत्ता सांगणं सोपं नाही. मात्र, उद्या राजकारणात काहीही घडू शकतं. महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे. त्यामध्ये ठाकरे महत्त्वाचे नेते असून, ते हिंदुत्ववादी आहेत. पण पंतप्रधानपदासाठी या देशाला मुख्य चेहरा कोण असेल? हे सांगण्यापेक्षा सध्या एकत्रित येणं गरजचं आहे'', असंही राऊत म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT