Sanjay Raut News: 2024 ला उद्धव ठाकरे विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदासाठीचा चेहरा असतील का?; राऊतांनी स्पष्ट सांगितलं..

Uddhav Thackeray : ''उद्धव ठाकरे हे एक उत्तम चेहरा आहे...''
Sanjay Raut and Uddhav Thackeray
Sanjay Raut and Uddhav ThackeraySarkarnama

Shivsena News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी करायला सुरवात केली आहे.

असे असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधी पक्षाने मोट बांधण्यास सुरवात करणं गरजेचं असून यासाठी शिवसेना पुढाकार घेण्यास तयार आहे, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

त्यांनी केलेल्या या विधानामुळे उद्धव ठाकरे हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसेच ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात यावे, अशी आमची इच्छा आहे, असंही राऊतांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

Sanjay Raut and Uddhav Thackeray
Ahmednagar News : माजी मंत्री शंकरराव गडाखांच्या दूध संघाचा वीज पुरवठा तोडला

राऊत म्हणाले, ''उद्धव ठाकरे हे एक उत्तम चेहरा आहे. महाविकास आघाडीने ठरवलं होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असतील तरच आपण एकत्र येऊ. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार बनलं. आज जे विरोधी पक्षामध्ये मुख्य चेहरे आहेत, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अधिक महत्वाचा आहे'', असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

Sanjay Raut and Uddhav Thackeray
Ashwini Jagtap : शपथविधीपुर्वीच आमदार अश्विनी जगताप लागल्या कामाला; ...तर मी पुन्हा येईन म्हणत डॉक्टरांना इशारा

2024 ला उद्धव ठाकरे हे विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदासाठीचा चेहरा असतील का? या प्रश्वावर राऊत म्हणाले की, ''याबाबत आत्ता सांगण सोपं नाही. मात्र, राजकारणात काहीही घडू शकतं. महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे. त्यामध्ये ते ठाकरे असून हिंदुत्ववादी आहेत. पण पंतप्रधानपदासाठी या देशाला मुख्य चेहरा कोण असेल? हे सांगण्यापेक्षा सध्या एकत्रित येणं गरजचं आहे'', असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, ''पंतप्रधानपदासाठी चेहरा कोण असेल, हे नंतर ठरवता येईल. मात्र, आधी एकत्र येऊन निवडणुका लढवणं महत्वाचं आहे'', असंही ते यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com