Swatantra Veer Savarkar Movie : Devendra Fadnavis Nesw Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : व्यस्त कार्यक्रमांतून फडणवीसांनी काढला 'स्वातंत्र्यवीर सावरकर'साठी वेळ; स्पेशल स्क्रीनिंगला हजेरी...

Swatantra Veer Savarkar Movie : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला उपस्थित राहणार...

Chetan Zadpe

Mumbai News : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'स्वातंत्र्यवीर सावरकर'हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) यांनी या चित्रपटात सावरकरांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. हाच चित्रपट आज राज्याचे उममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहणार आहेत. (Latest Marathi News)

एकीकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये निवडणुकांच्या रणनीती आखण्यात फडणवीस प्रचंड व्यस्त आहेत. मात्र, या बैठकांच्या व्यस्त सत्रानंतर फडणवीस 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट पाहणार आहेत. आज संध्याकाळी सातच्या सुमारास अंधेरी येथील फन रिपब्लिक सिनेमा थिएटरमध्ये स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आले आहे. या वेळी फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित राहणार आहेत. या वेळी सिनेमातील मुख्य कलाकार रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) यांच्या उपस्थितीत हे विशेष स्क्रीनिंग पार पडणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्वातंत्र्यवीर सावरकर' बॉक्स ऑफिस कलेक्शन - (Swatantra Veer Savarkar Box Office Collection)

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट हा मागील शुक्रवारी 22 मार्च 2024 रोजी देशभर प्रदर्शित झाला आहे. सॅकनिल्क एंटरटेन्मेंट या संस्थेच्या माहितीनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी सावरकर सिनेमाने 1.5 कोटींचा गल्ला जमा केला होता. दुसऱ्या दिवशी यात वाढ होऊन 2.25 कोटींची कमाई झाली. तिसऱ्या दिवशीही 2.7 कोटी एवढी होती.

दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाने कमाईत सातत्य ठेवले. चौथ्या दिवशी 2.15 कोटींची कमाई, पाचव्या दिवशी 1.05 कोटी, सहाव्या दिवशी 1 कोटी आणि सातव्या दिवशी 1.15 कोटींची कमाई केली आहे. आता पर्यंत सात दिवसांची कमाई 11.35 कोटी झाली आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT