NCP Complaint : शरद पवार गटाची तक्रार; पण निवडणूक आयोग शिवसेना, भाजपवर 'ॲक्शन' घेणार का ?

NCP Vs Shiv Sena And BJP : इतर पक्षातील नेत्यांना आयात करत त्यांना स्टार प्रचारक करणे भाजप आणि शिवसेनेच्या अंलगट येऊ शकते. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदविली आहे.
NCP, Shivsena and BJP
NCP, Shivsena and BJPSarkarnama

Loksabha Election 2024 : भाजप आणि शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे राज्यात नवा वाद निर्माण होऊ शकतो. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत भयमुक्त वातावरणात निवडणूक होण्यासाठी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग भाजप आणि शिवसेना यांच्यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भारतीय जनता पक्ष यांनी लोकप्रतिनिधी कायदा आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची गंभीर तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. स्टार प्रचारकांचा मुद्दा थेट आचारसंहिता भंग प्रकरणात येत असून, याची गंभीर दखल भारत निवडणूक आयोगाने घ्यावी आणि कारवाई करावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांनी त्यांच्या स्टार प्रचारक यादीचा भाग म्हणून इतर राजकीय पक्षांमधील विविध व्यक्तींची नावे प्रसिद्ध केली आहेत, जी लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 77 चे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे भयमुक्त वातावरणात निवडणूक होण्यास बाधा निर्माण झाल्याचे त्याचबरोबर आदर्श आचारसंहिता भंग झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

NCP, Shivsena and BJP
Devendra Fadnavis News : ‘आम्ही ऑपरेशन केले, तर तुम्हाला कळतच नाही’; दानवेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर फडणवीसांची गुगली

शिवसेनेने ( शिंदे गट) पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इत्यादी उच्च सार्वजनिक पदावर असलेल्या विविध लोकांची नावे प्रसिद्ध केली आहेत. हे केवळ नियमांचे उल्लंघन नाही, तर लोकप्रतिनिधी कायदाचा भंग आहे. केंद्र किंवा राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून अशाप्रकारे त्यांचा समावेश करणे हे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे आहे. अशा प्रकारे स्टार प्रचारकांच्या यादीत निवडणूक प्रचाराच्या उद्देशाने त्यांच्या अधिकृत पदांचा वापर स्पष्टपणे प्रतिबंधित असताना तसा उल्लेख स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्धीत देताना करण्यात आला. हा सर्व प्रकार आदर्श आचारसंहिता भंग करण्याचा व भयमुक्त वातावरणात निवडणुकीस बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे म्हणत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

भयमुक्त आणि नि:पक्षपातीपणे निवडणुका घेण्यासाठी दोन्ही पक्षांवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने व्यक्त केली. स्वपक्षीय नेत्यांनाच स्टार प्रचारक करण्याची गरज असताना इतर पक्षातील नेत्यांना आयात करत स्टार प्रचारक करणे भाजप आणि शिवसेनेच्या अंगलट येऊ शकते. स्टार प्रचारकांच्या मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. लोकप्रतिनिधी कायद्याच्या आधारे केलेल्या तक्रारीवर निवडणूक आयोग काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे ठरेल.

काय आहे नेमके प्रकरण

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांनी 27 मार्च रोजी 40 स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली. या यादीत उच्च पदावर असलेल्या व्यक्तीचे पदनिहाय नाव नोंदविण्यात आले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर भाजपने महाराष्ट्रासाठी 40 स्टार प्रचारकांची यादी घोषित केली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.

शिवसेनेने त्यांच्याच पक्षाचे नेते हे स्टार प्रचारक करण्याची गरज होती, तर भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना स्टार प्रचारक कसे केले, हा वादाचा विषय असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अधोरेखित केला आहे. त्यामुळे 1951 च्या लोकप्रतिनिधी कायद्याचे हे उल्लंघन असून, भाजपने केवळ भाजपच्या नेत्यांचा स्टार प्रचारक म्हणून उल्लेख करणे गरजेचे होते, तर शिवसेनेने केवळ शिवसेनेच्या नेत्यांचा अर्थात स्वपक्षीय नेत्यांचा स्टार प्रचारक म्हणून उल्लेख करणे गरजेचे होते.

पण, स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात इतर पक्षांतील नेत्यांचा समावेश शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाने केल्याने आदर्श आचारसंहिता आणि लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तशी तक्रारच भारत निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. भाजप आणि शिवसेनेवर कठोर कारवाईची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर लोकसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोग भाजप आणि शिवसेनेवर काय कारवाई करते हे पाहण्यासारखे ठरेल.

(Edited By Deepak Kulkarni)

R

NCP, Shivsena and BJP
Mahdev Jankar News: परभणीतून महादेव जानकरांना महायुतीची उमेदवारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com