devendra fadnavis,raj thackeray sarkarnama
मुंबई

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच फडणवीस आज ठाकरेंना भेटणार

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मनसे नेते अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा काल सुरू होती.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाविकास आघाडीला सत्तेवरून खाली खेचत शिवसेना-भाजपा युतीने सरकार स्थापन केले. त्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis)हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray)यांची भेट घेणार आहे. या भेटीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होणार याबाबतच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. (raj thackeray latest news)

राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होणार आहे. आज सकाळी ११ वाजता राज ठाकरे यांची फडणवीस भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच हे दोन नेते भेटत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मनसे नेते अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा काल सुरू होती. परंतु प्रत्यक्ष राज ठाकरे यांनीच हे वृत्त खोटे असल्याचे सांगितल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना एक पत्र लिहून त्यांचे कौतुक केले होते. त्याचा उल्लेख फडणवीस यांनी विधानसभेतही केला होता. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना आपण राज ठाकरे यांना भेटणार असल्याचे फडणवीस म्हणाले होते.

"काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाली झाली होती.त्याबद्दलही मला त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायची आहे," असेही फडणवीस यांनी सांगितले आहे. "मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला सुंदर पत्र लिहिले. मी उत्तर देणार होतो. मी प्रयत्नही केला पण त्यांच्यासारखे शब्द मला सुचले नाहीत. फोन करुन त्यांचे आभार मानले आणि त्यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहे," असे फडणवीस यांनी नुकतेच सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT