BJP- Congress Politics : Sarkarama
मुंबई

BJP- Congress Politics : भिडेंवर कारवाईची मागणी, फडणवीसांचा 'शिदोरी'वरही डोळा

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Politics : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडेंविरोधात कारवाईचा मुद्दा तापवून अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले. या प्रकरणात काँग्रेसच्या नेत्यांना आलेल्या धमक्यांवरूनही विरोधकांनी सवाल-जबाब केले. भिडेंचा निषेध करण्यासाठी भाजपचा सत्तेतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसही (अजित पवार गट) रस्त्यावर उतरल्याने सत्ताधाऱ्यांची पंचाईत झाली. भिडेंवरील कारवाईचा रेटा वाढल्याने सरकार ‘बॅकफूट’वर येण्याची चिन्हे आहेत. अशांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सावरकरांवरील आक्षेपार्ह लिखाणाचा मुद्दा उकरून काढला आणि या प्रकरणात काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या मासिकावर कारवाईचे संकेत दिले.

संभाजी भिडेंनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरली. यानंतर या दोघांनाही धमक्याही आल्या. ठाकूर आणि चव्हाणांना देण्यात आलेल्या धमक्यांप्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात, महापुरूषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले . त्याचवेळी ठाकूर आणि चव्हाण यांना धमक्या देणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा शब्दही दिला.

पण याचवेळी त्यांनी काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या 'शिदोरी' मासिकावरही कारवाईचा थेट इशारा दिला आहे. " संभाजी भिडेंविरोधात अमरावती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपच्या आवाजाचे नमुने घेऊन त्याची योग्य तपासणी केली जाईल, जे कोणी महापुरूषांबद्दल अपमानकारक वक्तव्य करतील, त्यांच्यावर पोलीस कारवाई होईलच, असं फडणवीसांनी ठणकावून सांगितले.

पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीही आक्षेपार्ह वक्तव्ये आणि लिखाण करणाऱ्यांकडेही लक्ष वेधलं. काँग्रेसच मुखपत्र असलेल्या 'शिदोरी' मासिकात सावरकरांविषयी आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे. 'वीर सावरकर माफीवीर होते. ते समलैंगिक होते. ते स्वातंत्र्यलढ्यात नव्हते,' असं ज्या प्रमाणे संभाजी भिडेंच्या वक्तव्याविरोधात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, त्याचप्रमाणे सावरकरांविरोधात लिखाण करणाऱ्या शिदोरी मासिकावर गुन्हा दाखल करणार, असल्याचं फडणवीसांनी सभागृहात स्पष्ट केलं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT