Mumbai News : औरंगजेबचे स्टेट्स ठेवल्यावरून घडलेल्या दंगली, त्यानंतरची कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष वेधून भाजप आमदार नितेश राणेंनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला. तेव्हाच विरोधकांना 'टार्गेट' करीत ज्यांना औरंगजेबचा पुळका आहे, त्यांनी पाकिस्तानात जावे, अशी राणेंनी सल्लावजा टिपण्णी केली. त्यावर आमदार अबु आझमी आणि रईस शेख यांनी आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी केल्याने राणेही त्यांना सामोरे गेले. राणे, आझमी आणि शेख हे तिघांनीही एकाचवेळी टोकाची भाषा केल्याने सभागृह तापले. यावेळी अध्यक्षांनी मध्यस्थी करून राणेंना प्रश्नावकडे वळण्यास भाग पाडले. (Latest Political News)
नितेश राणेंनी लोकप्रतिनिधी वंदे मातरम म्हणणार नाही, असे काही लोकप्रतिनिधी जाहीरपणे सांगत असून शिवरायांच्या भूमित औरंगजेबचा गौरव करत आहेत. औरंगजेबाचे स्टेट्स ठेवणारी मुली कोण, त्यांचा 'मास्टरमाइंड' कोण, याच्या शोधासाठी 'एसआयटी' स्थापन करणार आहात का? तसेच अशा लोकांना काही पोलीस प्रशासनातील काही मंडली मदत करत आहेत. योग्य वेळी या प्रकरणांचा तपास न करता संबंधितांना मदत करतात. या पोलीस अधिकाऱ्यांची खात्याअंतर्गत चौकशी होईल का? असे दोन प्रश्न राणेंनी लक्षवेधीत मांडले.
राणेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "देशावर आक्रमण करणारा औरंगजेब कुणाचाही नेता होऊ शकत नाही. तो तर्किक मंगोल असल्याने भारातील मुस्लिमाचाही हिरो होऊ शकत नाही. त्यामुळे जाणीवपूर्वत स्टेट्स ठेवून, त्याचा फोटो घेऊन उदात्तीकरण करणे असे यापू्र्वी कधीही झालेले नाही. यामुळे दोन समुदायात तेढ निर्माण करणाऱ्याविरोधांत कारवाई करणे गरजेचे आहे. याबाबत काही धागेदोरे हाती लागले असून या प्रकरणाच्या खोलापर्यंत तपास सुरू आहे. सध्या एटीएस स्थापन केली नसली तरी आयबी आणि सीबीआय तपास करत आहे. "
दंगल झाल्यांनी पोलिासंनी वेळेत कारवाई केली नाही, असे स्पष्टीकरण देत फडणवीसांनी खात्यांतर्गत चौकशी करणार असल्याचेही यावेळी सांगितले. "दोन समाजात वाद झाल्यानंतर पोलिसांनी वेळेत कारवाई करणे गरजेचे होते, मात्र तसे काही झाले नाही. त्याला उशीर का झाला, अशा प्रकारांना पोलीस खात्यातून कुणाची फूस होती का, असे काही आढळले तर संबंधित पोलिसांवरही कारवाई केली जाईल", अशी ग्वाही दिली.
राणेंचे प्रश्न आणि फडणवीसांच्या उत्तरांनंतर चिडलेल्या आमदार अबु आझमींनी मुस्लिमांना वारंवार लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, स्टेट्स ठेवले म्हणून काही मुलांवर गुन्हे दाखल केले, मात्र औरंगजेबांच्या कबरीवर फुले वाहिलेल्या प्रकाश आंबेडकरांवर कुठलीही कारवाई केली नाही. मुस्लिमांना दाढी ठेवून रेल्वेतून प्रवास करणेही धोक्याचे वाटू लागले आहे. धर्मिक द्वेषातूनच रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने प्रवाशांची गोळ्या घालून हत्या केली. गांधीची हत्या केल्याल्या गोडसेंचा गौरव करणाऱ्यांना मला गद्दार म्हणण्याचा काही अधिकार नाही."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.