Dhananjay Munde, Ajit Pawar, Jayant Patil 

 

sarkarnama

मुंबई

धनंजय मुंडेंनी वरिष्ठांचा आदर ठेवला... जयंत पाटलांना स्वतः चहा आणून दिला...

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते आणि आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये हास्य विनोद रंगले.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्य विधीमंडळाचे अधिवेशन (assembly session) बुधवारपासून (ता.२२) सुरू होत आहे. या निमित्ताने सह्याद्री अतिथिगृहातील चहापानाचा कार्यक्रम झाला. या वेळी महाविकास आघाडी आणि घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात चांगल्याच गमती-जमतीही रंगल्या.

या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) , सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजीक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde), शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, बाळासाहेब पाटील, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, अस्लम शेख, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, राज्यमंत्री शंभूराज देसाई, लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सह्याद्री अतिथिगृहा येथे चहापानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जयंत पाटील यांनी चहा घेतला. त्याच वेळी शेकापचे जयंत पाटील तेथे आले. तेव्हा जयंत पाटील यांनी आपल्या हातातील चहा पाटील यांच्या पुढे केला. लगेच अजित पवार यांनी हात पुढे करत त्यांना नको म्हटले. तेथे उपस्थित असलेले धनंजय मुंडे यांनी लगेच जयंत पाटील यांच्यासाठी चहा आणला. धनंजय मुंडे यांच्या हातातील चहाचा कप आपल्या हातात घेत अजित पवार यांनी तो जयंत पाटील यांच्या हातात दिली. त्यावरुन उपस्थित नेत्यांमध्ये चांगलाच हशा पिकला.

महाविकास आघाडीच्या चहा पानावर बहिष्कार घातला तरी हा कार्यक्रम उत्सहात पार पडला. महाविकास आघाडीचे नेते आणि आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये हास्य विनोद रंगले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजूनही ठणठणीत झाले नसल्याने ते आज पूर्वसंध्येच्या चहापानाला उपस्थित राहू शकले नाही. त्यांची कसर कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी भरूण काढली. आदित्य ठाकरे यांच्या भोवती मंत्री, आमदारांचा गराडा राहिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT