Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : धारावी पुनर्विकास प्रकल्प म्हणजे सर्वात मोठा टीडीआर घोटाळा! संजय राऊतांनी भाजपला घेरलं

Rajanand More

Dharavi Redevlopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्प हा या देशातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या घोटाळ्यामध्ये भाजपचे हातही बरबटले आहेत. धारावी हा पहिला घास असून त्यानंतर मुंबई गिळण्याचे गुजरात लॉबीचे गुजरात मॉडेल कार्यरत असल्याची टीकाही राऊत यांनी केली.

शिवसेना (Shuv Sena) उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून आज धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात (Dharavi Redevlopment Project) उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या मुंबईतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा टीडीआर लॉबीच्या भल्यासाठी सुपारी घेऊन काढण्यात येणार असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. त्याचप्रमाणे सरकारमधील इतर नेत्यांनीही या मोर्चावरून उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर देताना भाजपवर निशाणा साधला. आज पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, गौतम अदानी आणि त्यांच्या कंपनीच्या नावावरच मुंबईचा सातबारा केला आहे, अशाप्रकाराचा हा प्रकल्प आहे. मुंबईतील गरीब जनतेला व्यवसाय करण्यासाठी तिथे जागा मिळायला हव्यात. सरकार हा प्रकल्प का करत नाही. उद्योगपतीच्या घशात धारावी घातली जात आहे. हा प्रकल्प देशातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा आहे. त्यामध्ये भाजपचे हातही बरबटले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गुजरात पोर्टवर सातत्याने ड्रग्ज उतरत आहे. ते महाराष्ट्रात येत आहे. आता जर धारावी त्यांच्या ताब्यात गेली, तर तेथील तरुणांना ड्रग्जच्या पुड्या विकायला लावणार आहात का, अशी टीका राऊतांनी केली. मुंबई विकण्याचे हे मोठे षडयंत्र आहे. मोर्चा निघू नये म्हणून दिल्लीतून महाराष्ट्र सरकारवर दबाव टाकण्यात आला. जनतेची मुस्कटदाबी करण्यासाठी पोलिस, प्रशासनावर दबाव होता. हा दबाव मोडून आम्ही मोर्चा काढत आहोत, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

सरकारने आंदोलनात फुट पाडण्याचा नेहमीचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी, शिवसेनेत फुट पाडली. तशीच फुट मोर्चातही पाडली जात आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शुन्य योगदान असलेल्या भाजपकडून धारावीतील लोकांची फसवणूक केली जात आहे. प्रशासनाच्या माध्यमातून सरकार ठेकेदारांचे राज्य चालवत आहे. त्याविरुध्द आदित्य ठाकरे आपली भूमिका ठामपणे मांडत आहे, असे राऊत म्हणाले.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT