kedar Dighe Eknath Shinde Anand Dighe sarkarnama
मुंबई

kedar Dighe : दिघे साहेबांच्या मृत्यूवर 22 वर्ष गप्प का बसलात? आनंद दिघेंच्या पुतण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल

kedar Dighe Eknath Shinde Anand Dighe : एकनाथ शिदेंनीच सांगितले होते की दिघे साहेबांचा मृत्यू कशामुळे झाला होता. हार्ट अटॅकमुळे दिघेंचा मृत्यू झाल्याचे शिंदे म्हणाले होते. त्यांची एक क्लीप देखील आहे, असे केदार दिघे म्हणाले.

Roshan More

kedar Dighe News : धर्मवीर 2 या सिनेमाचे ट्रेलर नुकतेच रिलीज झाले. या सिनेमातून आनंद दिघे यांच्या मृत्यूचे गुढ उलगडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सिनेमात आनंद दिघे यांचा मृत्यू कशामुळे झाला हे दाखवणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते करत आहेत. मात्र, यावरून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मागील 22 वर्ष तुम्ही साहेबांच्या मृत्यूचे राजकारण करत आहात. ते पण स्वतःच्या स्वार्थासाठी मग 22 वर्ष गप्प का बसलात? असा थेट सवाल केदार दिघे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच एका व्हिडिओचा संदर्भ देत केदार दिघे म्हणाले, की अडीच वर्षापूर्वी शिदेंनीच सांगितले होते की दिघे साहेबांचा मृत्यू कशामुळे झाला होता. हार्ट अटॅकमुळे दिघेंचा मृत्यू झाल्याचे शिंदे म्हणाले होते. त्यांची एक क्लीप देखील आहे.

तुम्ही त्या वेळेला सांगितलं होतं तर मग निवडणुकीच्या आधी तुमच्या नेत्यांनी स्टेटमेंट देत आहेत की दिघे साहेबांच्या मृत्यूचं गूढ काढू, याचा अर्थ काय? असा सवाल केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे.

दिघे साहेबांचा शिंदेंकडून अपमान

दिघे साहेबांच्या हिंदुत्त्वाचा शिंदे आणि धर्मवीर चित्रपटाच्या टीमकडून अपमान होत आहे. स्वत:ला मोठे दाखविण्यासाठी शिंदे हे दिघे साहेबांना लहान का दाखवत आहेत? असा प्रश्न केदार दिघे यांनी उपस्थित केला.

संवादावर आक्षेप

धर्मवीर दोनच्या ट्रेलरमध्ये आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील एक संवाद दाखविण्यात आला आहे. या संवादात आनंद दिघे हे एकनाथ शिंदे सांगत होते की, तुझ्या आणि हिंदुत्त्वामध्ये येथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्त्वाला मिठी मार. या संवादावर केदार दिघे यांनी आक्षेप घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT