Cm Eknath Shinde-Abdul Sattar News Sarkarnama
मुंबई

मंत्री सत्तारांनी केली मुख्यमंत्र्याच्या पीएनांच शिवीगाळ?

Abdul Sattar : मुख्यमंत्री शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री आणि अब्दूल सत्तार आणि मुख्यमंत्र्याचे (पीए) स्वीय सहाय्यक यांच्यात बाचाबाची झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे सत्तारांच्या या वागण्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. (Cm Eknath Shinde-Abdul Sattar News)

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मोठा वाद सुरू आहे. हा वाद कायदेशीर देखील असून सप्रीम कोर्टात पोचला आहे. या वादाचे काही निर्णय अद्यापही कोर्टात प्रलंबित आहेत. मात्र, शिवसेना कुणाची आणि पक्षचिन्ह कुणाचं याबाबतचा फैसला करण्याची परवानगी निवडणूक आयोगास कोर्टाने दिल्याने त्याबाबतचा फैसला काल झाला आणि शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

आंधेरी पुर्व विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल तात्पुरत्या स्वरूपात लागला असून यामध्ये शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हं हे तुर्तास गोठवण्यात आले आहे. यामुळे दोन्ही गटाला आपली चिन्हे आयोगाला सुचवायची आहेत.

या पार्श्वभूमीवर आज शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शासकीय विश्रामगृहावर बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी राज्याचे कृषिमंत्री आणि अब्दूल सत्तार देखील या बैठकीला उपस्थित होते. यावेळी त्यांच्यात आणि मुख्यमंत्र्याचे (पीए) स्वीय सहाय्यक यांच्यात बाचाबाची झाल्याची माहिती मिळत आहे. सत्तारांच्या या वागण्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, शिवसेनेसोबत बंड केल्यावर शिंदे गटाच्या काही नेत्यांच्या वक्तव असो किंवा अधिकाऱ्यांना मारहाण करणं असो यामुळे शिंदे आणि फडणवीसांची डोकेदुखी चांगलीच वाढत आहे. यामध्ये आता कॅबिनेट मंत्री यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदेंच्या पीएनांच शिवीगाळ देण्यापर्यंत मजल गेल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मात्र, याबाबत नक्की काय घडलं होत याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT