थरूर यांनी गांधी घराण्याचे निष्ठावंत सुशील कुमार शिंदेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण...

Congress : गांधी घराण्याचे विश्वासू आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
Shashi Tharoor, Mallikarjun Kharge, Latest News
Shashi Tharoor, Mallikarjun Kharge, Latest NewsSarkarnama

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचा (Congress) अध्यक्ष कोण होणार याच्यावरून जोरदार चर्चा सुरू होती. मात्र आता याबाबतचा अंतिम निर्णय होणार असून या अध्यक्ष निवडीच्या निवडणुकीत काँग्रेस हायकमांडचे विश्वासू मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) विरुद्ध काँग्रेसमधील दुसऱ्या गटाचे नेते शशी थरूर असा हा सामना रंगणार हे निश्चित झालं आहे.

दरम्यान, यासाठी दोन्ही नेत्यांकडून देशभर प्रचार दौरे करण्यात येत आहेत. मल्लिकार्जुन खर्गे हे शुक्रवारी (ता.८ ऑक्टोबर) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुंबईमध्ये काही कार्यकारणी सदस्यांच्या भेटीही घेतल्या आहे. आता त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार शशी थरूर हे देखील आज (ता.९ऑक्टोबर) मुंबईत प्रचार करण्यासाठी आले होते. या दौऱ्यात त्यांनी गांधी घराण्याचे विश्वासू आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या मुंबईतील घरी भेट दिली आणि सुमारे दिड तास चर्चा करून नाश्ता केला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. (Shashi Tharoor, Mallikarjun Kharge, Latest News)

Shashi Tharoor, Mallikarjun Kharge, Latest News
मनसेनं बॅनरबाजी करून शिवसेना आणि शिंदे गटाला डिवचलं...

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर होती. मात्र दोघांपैकी कुणीही आपला अर्ज मागे घेतला नाही. यामुळे ही लढत खर्गे आणि थरूर यांच्यात होणार आहे. अध्यक्षपदाची निवडणूक ही 17 ऑक्टोबरला होणार आहे. यामुळे दोन्ही नेत्यांनी देशभर पक्ष कार्यकारणीतील नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा जोरदार प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

Shashi Tharoor, Mallikarjun Kharge, Latest News
Beed : आडसकरांचा `हाबाडा` तेव्हापासून राजकारणाच्या डिक्शनरीत, पवारांकडून आठवण..

दरम्यान, थरूर हे कॅाग्रेस मधील नाराज गटाचे उमेदवार आहेत. तर खर्गे हे गांधी घराण्याच्या जवळचे मानले जातात. यामुळे ही लढत चुरशीची होणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. परिणामी या निवडणुकीत जास्तीत जास्त मते मिळवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी भेटीगाठीचा धडाका लावला आहे. आज थरूर यांनी चक्क गांधी घराण्याचे विश्वासू असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या मुंबईतील घरी भेट दिली आणि सुमारे दिड तास चर्चा करून चहा नाश्ताही केल्याची माहिती मिळत आहे. यामुळे या भेटीची चर्चा अधिक होत असून शिंदे या निवडणुकीत कुणाला साथ देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com