Dilip Walse Patil Sarkarnama
मुंबई

Dilip Walse Patil : वळसे पाटलांच्या विजयात 'ट्रम्पेट' चिन्हाचा मोठा वाटा! लाभ झाल्याची कबुलीही दिली

Dilip Walse Patil on Trumpet symbol : जाणून घ्या, शरद पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळेस पाटील नेमकं काय म्हणाले?

Mayur Ratnaparkhe

Dilip Walse Patil on Vidhansabha Election Result News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. जनतेने महायुतीला भरघोस पाठिंबा दर्शवत विजयी केलं आहे. तर महाविकास आघाडीला मानहानीकारक पराभवास सामोरं जावं लागलं आहे. अनेक मतदारसंघातील निकाल हे धक्कादायक ठरले, कारण या ठिकाणी नवख्या उमेदवारांनी दिग्गज नेत्यांना पराभूत केल्याचं दिसून आलं आहे.

याशिवाय काही ठिकाणी अपक्षांमुळे किंवा छोट्या पक्षाच्या उमेदवारांमुळे विजयी उमेदवाराला फायदा झाला आहे. असंच काहीसं महायुतीचे आंबेगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil ) यांच्याबाबत घडलं आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेलं तुतारी चिन्ह विधानसभा निवडणुकीतही कायम होतं.खरंतर हे चिन्ह आणि अपक्ष उमेदवारांना मिळालेलं ट्रम्पेट हे चिन्ह यामध्ये सर्वसामान्य मतदारांची चांगलीच गलत झालेली दिसली. लोकसभा निवडणुकीत साताराची जागा यामुळेच शरद पवारांच्या(Sharad Pawar) पक्षाला गमावावी लागल्याचे नंतर दिसून आले. त्यानंतर आता पुन्हा एकदा या ट्रम्पेटचा फटका आंबेगाव मतदारसंघात बसल्याचं दिसत आहे. आणि विशेष म्हणजे येथील महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनीही एकप्रकारे यास दुजारो दिल्याचं समोर आलं आहे.

कारण, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्य जयंतीनिमित्त आज मुंबईतील वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी दिलीप वळसे पाटील उपस्थित होते आणि या बैठकीस शरद पवारही होते. त्यामुळे निवडणूक निकालानंतर या नेत्यांची ही भेट चर्चेचा विषय ठरली. तर वळसे पाटील यांनी पवारांशी अगदी थोडक्यात चर्चा केल्याचं सांगण्यात आलं. शिवाय त्यांनी मीडियाशी बोलताना हे देखील सांगितलं की, यंदाची निवडणूक ही वेगळ्या प्रकारची निवडणूक झाल्याचं पवारांनी सांगितलं. तसेच, या निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हाचा मला लाभ झाल्याचंही यावेळी प्रांजळ कबुली दिली.

याआधी विधानसभा निवडणुकीच्या(Vidhansabha Election) प्रचारादरम्यान शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेत, गद्दारांना पाडा असे म्हटले होते. तसेच वळेस पाटील यांच्या विरोधात देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली गेली होती. मात्र त्याच नावाचा आणखी एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला गेला होता आणि विशेष म्हणजे त्याला मिळालेले चिन्हं देखील तुतारीशी मिळते जुळते असे ट्रम्पेट होते.

यामुळे शरद पवारांच्या उमेदवाराला मिळणारी मते विभाजित झाल्याचे दिसून आले. कारण, देवदत्त निकम यांच्या ट्रम्पेटल चिन्हाने एकूण २ हजार ९५० मतं मिळवली, तर वळसे पाटील यांचा विजय अवघ्या ११०० मतांनी झाला. त्यामुळेच वळसे पाटील यांनीही हे मान्य केले की त्यांना या निवडणुकीत ट्रम्पेटचा फायदा झाला.

(Edite by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT