Uttar Pradesh Assembly by-election : उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने बाजी उलटवली आहे आणि ९ पैकी ६ जागांवर ताबा मिळवला आहे. तर एक जागा त्यांचे सहकारी राष्ट्रीय लोक दलाच्या खात्यात गेली आहे. तेच दुसरीकडे समाजवादी पार्टीने केवळ पाच महिने आधीच लोकसभा निवडणुकीत पकडलेला वेग गमावला आहे आणि पक्ष केवळ दोन जागा जिंकू शकला आहे.
निवडणुकीचे राजकारण अतिशय कठीण आहे. कारण यामध्ये अतिशय वेगाने बदल होत आहे. विशेषता उत्तरप्रदेश सारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील राज्यात जिथे नऊ विधानसभा जागांवर झालेल्या पोटिनिवडणुकीच्या निकालाने सत्ताधारी भाजपला(BJP) लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर पुन्हा अव्वल स्थानी पोहचवलं आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath ) यांनी ऑगस्टमध्येच 'बंटेंगे तो कटेंगे' सारख्या घोषणेने पोटनिवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचार अभियानाचा मार्ग निश्चित केला होता. ही घोषणा हिंदू एकतेला मजबूत करण्यासाठी मोठ्या चतुराईने बिंबवली गेली होती आणि हीच घोषणा प्रचारादरम्यान सवर्त्र ऐकू येत होती.
भाजप प्रवक्ते मनीष शुक्ला यांनी म्हटले की, प्रदीर्घ काळापासून समाजवादी पार्टीचे(Samajwadi Party) राजकारण त्यांच्या 'एम-वाय' फॅक्टरच्या सभोवतालीच फिरत होते. हा फॅक्टर एका विशिष्ट समुदायाशी आणि जातीशी जुडलेला होता. मात्र भाजपने हाच फॅक्टर वेगळ्या स्वरूपात वापरला तो म्हणजे मोदी आणि योगी. जो या पोटनिवडणुकीत भाजपच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले.
योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे घोषणेने मुरादाबादच्या मुस्लिम बहुल कुंदरकी जागेवर भाजपच्या विजयात मोठा प्रभाव टाकला. या ठिकाणी पक्षाने तीन दशकांत तीन विजय मिळवलेला नव्हता. परंतु यंदा मतदार रामवीर सिंह यांच्या पाठिशी एकवटले होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.