Deepak Kesarkar , Sanjay Raut  Sarkarnama
मुंबई

राऊतांवरील कारवाई अन् मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा; केसरकरांनी स्पष्टच सांगितले

काल मुख्यमंत्री दिल्लीत गेले आणि कारवाई झाली, अशी चर्चा सुरु आहे

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर होत असलेल्या कारवाई बाबत आनंद होत आहे, असे आमदार संजय शिरसाट म्हणाले होते. त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, ही आमची भूमिका नाही. काल मुख्यमंत्री दिल्लीत गेले आणि कारवाई झाली, असा कोणताही सबंध नाही. राऊतांवर होणारी कारवाई पुराव्यांवर अवलंबून आहे, असेही केसरकर यांनी सांगितले.

केसरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले, यात आमचा सबंध आहे हे बोलणे चुकीचे आहे. मुंबई पोलीस (Police) कायदा सुव्यवस्था राखण्यात सक्षम आहेत, असल्याचेही केसरकर म्हणाले. राऊत यांचा या प्रकरणाशी सबंध आहे की नाही, त्यापेक्षा सर्व सामान्य मुंबई कराना न्याय मिळाला पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौऱ्याला करवाईशी जोडणे चुकीचे आहे. खूप महिन्यापासून ही चौकशी सुरू आहे, संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा नाही, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते झोपडपट्टी वासीयांना त्यांचे हक्काचे घर मिळेल पाहिजे. मात्र, आज आपण बघतो या लोकांना बाहेर काढले जाते आणि त्यांना घर दिले जात नाही. गरिबांना घर मिळत नाही आणि असा विषय असेल तरी गरिबांना न्याय मिळायला हवा. लवकरच आमचा मंत्रीमंडल विस्तार होईल, यासाठी काल दिल्ली भेट होती, असे केसरकर म्हणाले.

मंत्रीमंडळ विस्तारानंतर सर्व गोष्टी फायनल होतील. संजय राऊत हे सोनिया गांधी यांना किती वेळा भेटले यांची यादी काढा, असेही केसरकर म्हणाले. शिरसार यांच्या वक्तव्यावर बोलतना केसरकर म्हणाले, राऊत बऱ्याचदा बोलले असतील त्यामुळे शिरसाट यांच्याकडून न कळत वक्तव्य आले असेल. राज्यपालांना जी भाषणासाठी जी तयारी करते ती यंत्रणा चुकते का हे पाहू. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसे दुखावली जाणार नाही याची काळजी राज्यपाल घेतील, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

याआधी प्रवीण राऊत, अविनाश भोसले यांच्यावर कारवाई झाली ते कोणत्या पक्षाचे नव्हते ना. या कारवाया पक्ष बघून होत नाही. बिल्डर लोकांना हक्काची घर देत नाही. केवळ राजकीय पक्षावर कारवाई होते असे नाही. त्यांची बाजू भक्कम असेल तर त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यांना अटक झालेली नाही झाली तर त्यांना न्यायालयासमोर जावे लागेल, असेही केसरकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT